पोस्ट्स

मे, २०२३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

निळवंडे धरण कालव्यांच्या उर्वरित कामासाठी निधी कमी पडू देणार नाही - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

इमेज
शिर्डी - निळवंडे धरण लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांसाठी आजचा दिवस आनंदाचा व ऐतिहासिक आहे. निळवंडे धरण कालव्यांच्या उर्वरित कामासाठी निधीची कमतरता पडू देणार नाही. हे शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. असा  विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. धरणामुळे विस्थापित झालेल्या शेतकऱ्यांना मोबदल्यापासून वंचित ठेवले जाणार नाही. अशी ग्वाही ही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली. अहमदनगर व नाशिक जिल्ह्यातील दुष्काळी भागासाठी जीवनदायी ठरणाऱ्या निळवंडे धरणातून पाणी सोडण्याची प्रथम चाचणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज निब्रळ येथे पार पडली. कार्यक्रमाच्या प्रारंभी  मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते जलपूजन करून निळवंडे धरणाच्या डाव्या कालव्यातून पाणी सोडण्याची चाचणी घेण्यात आली. यावेळी महसूल, पशुसंवर्धन, दूग्ध व्यवसाय विकासमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण ‍विखे पाटील, खासदार सदाशिवराव लोखंडे, खासदार डॉ. सुजय विखे पाटील, जलसंपदा विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव दीपक कपूर, नाशिक विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, जिल्हाधिकारी सिध्दाराम सालीमठ, जल

अहमदनगर जिल्ह्याला अहिल्यादेवी होळकर यांचे नाव देणार -- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा

इमेज
         अहमदनगर :- पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांनी उत्तम राज्य कारभाराचा आदर्श घालून दिला  आहे. भारताला प्रशासकीय संरचनेची मोठी देणगी दिली आहे. अहमदनगर जिल्ह्याला अहिल्यादेवी होळकर यांचे  नाव देण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे केली. त्यांच्या नावामुळे जिल्ह्याचा मान मोठा होणार असल्याचेही ते म्हणाले.          चौंडी ता.जामखेड येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 298 व्या जयंतीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी मुख्यमंत्री श्री. शिंदे बोलत होते.          व्यासपीठावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल, पशुसंवर्धन, दुग्धविकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, खासदार सदाशिवराव लोखंडे,खासदार सुजय विखे पाटील, आमदार प्रा.राम शिंदे, आमदार मोनिकताई राजळे, आमदार बबनराव पाचपुते, आमदार गोपीचंद पडळकर,अण्णासाहेब डांगे, आमदार सुरेश धस, माजी खासदार विकास महात्मे, माजी आमदार भीमराव धोंडे, बाळासाहेब मुरकुटे, लक्ष्मणराव ढोबळे, पोपटराव गावडे आदी उपस्थित होते.            मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, छत्रपती

मोबाईल चोर एम.आय.डी.सी पोलीसांनी केला जेरबंद. ; स.पो.नि. राजेंद्र सानप यांच्या पथकाची कारवाई !

इमेज
  नगर ( प्रतिनिधी) :- नगर एम.आय.डी.सी. येथील मोबाईल चोरी करणारा चोरटा एम.आय.डी.सी. पोलीसांनी जेरबंद केला असून . या मोबाईल चोराकडून ८५,०००/- रु किमतीचे चार मोबाईल जप्त करण्यात आले आहेत. याबाबत सविस्तर माहिती अशी की, दिनांक २८/०५/२०२३ रोजी १० ११ वा चे सुमारास फिर्यादी नामे अभिषेक सतिष झुगे, वय १७ वर्षे रा. पढेगाव ता. श्रीरामपुर जि. अहमदनगर ह. रा. शिवाजीनगर, नवनागापुर ता. जि. अहमदनगर यांनी फिर्याद दिली की दि. २७/०५/२०२३ रोजी रात्री फिर्यादी व त्यांचे मित्र हे त्यांचे घराचे टेरेसवर झोपलेले असतांना उशाशी ठेवलेले ६५,०००/- रु किमतीचे दोन मोबाईल रात्री ०१.०० वा ते ०४.०० वा चे सुमारास अज्ञात चोरटयाने चोरुन नेले आहे. त्याबाबत एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुरनं. ४७२/ २०२३ भादंवि कलम ३७९ प्रमाणे गुन्हा दाखल आहे. सदर गुन्हयाचा तपास करत असतांना सपोनि राजेंद्र सानप यांना गोपनीय माहिती मिळाली की, सदरचा गुन्हा हा आरोपी नामे बाळु शंकर काळे, वय १८ वर्षे २ महिने रा. चेतना कॉलनी, खंडोबा मंदिराचे पाठीमागे,ता. जि. अहमदनगर याने केला आहे अशी माहिती मिळाल्याने सदर आरोपींना पकडणेकरीता एमआयडीसी पोलीसस्टेशनचे पथक तयार

गायरान जागेवरील घरकुले नियमित करण्यात येतील - महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील.

इमेज
शिर्डी( प्रतिनिधी) - येत्या काळात वाळू धोरणात सुटसुटीतपणा आणून वाळू वाहतूक करिता खूली परवानगी देण्यात येईल. ओबीसी समाजाच्या घरकुलासाठी मोदी आवास योजना केंद्र शासन आणत आहे‌. यात मागेल त्याला घरकुल देण्यात येईल. गायरान जागेवर बांधण्यात आलेले घरकुले नियमित करण्यात येतील. अशा महत्त्वपूर्ण घोषणा राज्याचे महसूल, पशुसंवर्धन व दूग्ध व्यवसाय विकासमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज येथे केल्या.  राहाता तालुक्यातील पुणतांबा येथील पहिल्या शासकीय वाळू केंद्राचे उद्घाटन व लोकार्पण महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी अपर जिल्हाधिकारी सुहास मापारी, शिर्डी उपविभागीय अधिकारी माणिक आहेर, तहसीलदार अमोर मोरे, राहाता गटविकास अधिकारी जालिंदर पठारे, कोपरगाव गटविकास अधिकारी सचिन सुर्यवंशी,  पुणतांबाचे सरपंच डॉ.धनंजय धनवटे,  स्थानिक पदाधिकारी नितीन दिनकर, राजेंद्र बापू जाधव, सुभाष वहाडणे पाटील आदी यावेळी उपस्थित होते. निळवंडेच्या डाव्या कालव्यातून ३१ मे २०२३ रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पाणी स

नगर शहरातील रेल्वे पुलावर भीषण अपघात.

इमेज
  नगर ( प्रतिनिधी):- शहरातील नगर पुणे महामार्गावर असणाऱ्या रेल्वे पुलावर दुपारी अडीच वाजेच्या सुमारास माती वाहतुक करणारा ढंपर कठडे तोडून पुलावरून खाली कोसळून भीषण अपघात घडला आहे.        समजलेल्या माहिती नुसार, शहरातील नगर पुणे महामार्गावर असणाऱ्या रेल्वे पुलाचे कठडे तोडून पांढऱ्या रंगाचा मातीने भरलेला ढंपर पुलावरून खाली कोसळला आहे. प्रथम दर्शनी ढंपर चालकाचे ढंपर वरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडल्याचे समजते. रेल्वे पुलाच्या कठड्यामधे ढंपर अधांतरी अडकल्यानंतर ड्रायवर ढंपर मधून बाहेर पडून जखमी झाल्याचे समजते. तसेच अपघात ग्रस्त ढंपरमधून ऑईल सोबत रक्तदेखील मोठया प्रमाणात बाहेर येत होते. त्यामुळे अन्य कुणी अडकलय का ?  याचा शोध घेतला जात होता. परंतु ढंपर रेल्वे पुलावर  अधांतरी अडकल्यामुळे  प्रत्यक्ष दर्शी उपस्थित जमावाला शोधण्यात अडचण येत होती. त्यातच ढंपरच्या इंजिन मधून अचानक धूर निघू लागल्याने देखील बचाव करताना लोकांना अडचण येत असल्याचे समजते.            मातीने भरलेला ढंपर अचानक रेल्वे पुलाचे कठडे तोडून कोसळल्याने धुळीचा लोळ उठला होता. रेल्वे पुलावरील रस्ता अरुंद असल्याने अपघात पाहण्यासा

निळवंडे पाणी सोडण्याची चाचणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते महसूलमंत्री श्री. विखे पाटील यांची माहिती.

इमेज
शिर्डी (प्रतिनिधी)- उत्तर नगर जिल्ह्याला वरदान ठरणाऱ्या निळवंडे धरणाच्या  कालव्यातून पाणी सोडण्याची चाचणी शुभारंभ कार्यक्रमास  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित राहणार असल्याची माहिती महसूल, पशुसंवर्धन व दूग्ध व्यवसाय विकासमंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज येथे दिली.  ३१ मे रोजी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाची तयारी धरण स्थळावर सुरू करण्यात आली असून, लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांच्या दृष्टीने आनंददायी अशा सोहळ्यास उपस्थित राहावे. अशी विनंती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना केली होती. त्यांनी या कार्यक्रमास येण्याचे मान्य केले असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या पाणी सोडण्याची चाचणीचा शुभारंभ होणार आहे.  पाच तालुक्यांचे लाभक्षेत्र असलेल्या या निळवंडे धरणासाठी शेतकऱ्यांचे मोठे योगदान आहे. प्रकल्प मार्गी लागावा म्हणून राज्यात सत्तेवर असलेल्या त्या काळातील सरकारचे सहकार्य मिळाले. शेतकऱ्यांनी पाण्यासाठी मोठा संघर्ष केला. पाण्याची असलेली प्रतिक्षा आता पाणी सोडण्याच्या चाचणीमुळे संपणार असून लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांच्या दृष्टीने हा क्षण म

निळवंडे कालव्यांची कामे वेळेत पूर्ण करावीत - महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील. ; कालव्यांची पाहणी करून शेतकऱ्यांशी साधला संवाद

इमेज
शिर्डी ( प्रतिनिधी) -निळवंडे लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांना पाण्याचा लाभ मिळवून देण्यासाठी कालव्याची कामे ठेकेदारांनी निर्धारीत वेळेत पूर्ण करण्याची आवश्यकता आहे. मात्र कामामध्ये जाणीवपूर्वक हलगर्जीपणा करणाऱ्या ठेकेदारांना काळ्या यादीत टाकण्यात येईल. अशी माहिती महसूल, पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विकास मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज येथे दिली.  महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सलग दुसऱ्या दिवशी राहाता आणि संगमनेर तालुक्यातील निळवंडे कालव्यांच्या कामांची आज  पाहणी केली. शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या.  संगमनेर तालुक्यातील निमगावजाळी,  मनोली, घुलेवाडी, कुरण, खांजापूर, निळवंडे, कौठे कमळेश्वर, गोगलगाव,  आडगाव, मापारवाडी, लोणी खुर्द,  बाभळेश्वर, पिंप्री निर्मळ,  वाकडी आदी गावात कालव्यांच्या सुरू असलेल्या कामाची पाहणी केली. या दौऱ्यात महसूल, जलसंपदा विभागाचे अधिकारी उपस्थित होते. बहतांशी गावात कालव्यांची काम घेतलेल्या ठेकेदारांनी अर्धवट केली आहेत.अनेक ठिकाणी काम अद्यापही सुरू नाहीत.‌ या कामाचा ठेका घेतलेल्या कंपनीने मुदतवाढ घेतली तरीही कामाची परिस्

कामरगाव मधे बालसंस्कार शिबीरात विदयार्थी गिरवतायेत आध्यात्मिक व व्यक्तीमत्व विकासाचे धडे ! .

इमेज
नगर (हेमंत साठे):- परीक्षा संपल्या...उन्हाळी सुट्ट्या लागल्या कि मुले मन रमवायला मोबाईल, टी.व्ही. मधे तासन् तास गुंतून राहतात. असच काहीस चित्र आजकाल सर्वत्र दिसून येत आहे.         परंतु नगर तालुक्यातील कामरगाव येथे उन्हाळी सुट्टी मधे मुलांसाठी बालसंस्कार शिबीर हा अभिनव उपक्रम राबवण्यात येतोय. बालसंस्कार शिबीरा मधून गावातील विदयार्थ्याना उन्हाळी सुट्टी मधे मोबाईल, टी.व्ही च्या आभासी जगात अडकू न देता. विदयार्थ्यांचे विविध कलागुण व व्यक्तीमत्व विकासाचे धडे देण्यात येत आहेत. या बालसंस्कार शिबीराचे आयोजन गुरुकृपा संगीत विदयालया कडून सदगुरू साधुबाबा मंदिर परिसरात १५ मे ते ३१ मे पर्यंत करण्यात आले आहे. बालसंस्कार शिबीरातील काही क्षणांचे व्हिडिओ चित्रण👆 या शिबीरामधे गावातील ३० पेक्षा अधिक विद्यार्थ्यानी सहभाग घेतला आहे. बालसंस्कार शिबीरामधे विदयार्थ्याना पहाटे साडे पाच वाजेपासून साडे सहा वाजे पर्यंत योगासनाचे प्रशिक्षण देण्यात येते. तर सकाळी दहा वाजेपासून बारा वाजेपर्यंत शास्त्रीय संगीत प्रशिक्षण देण्यात येते. त्यानंतर विदयार्थ्याचे शालेय अभ्यासातील इंग्लिश व गणित विषयाचे क्लास प्रा.आशा प्रका

गावगाड्याच्या प्रश्नांची सरकारने घेतली दखल.; आश्वासनानंतर सरपंच परिषदेचे आंदोलन मागे.

इमेज
  सातारा:- सरपंच परिषद मुंबई महाराष्ट्र आणी रयतक्रांती संघटना यांनी गावगाड्याच्या आणी शेतकऱ्याच्या प्रश्नावर सुरू केलेले आंदोलन साताऱ्याच्या वेशीवर आल्यावर  चिघळण्याची शक्यता असतानाच सरकारने   आंदोलनाची दखल घेऊन सहकार मंत्री अतुल सावे मा. विरोधी पक्षनेते प्रवीण जी दरेकर आ. शिवेंद्र राजेभोसले आ. जयकुमार गोरे आ. गोपीचंद पडळकर  आदींनी सरकारचे लेखी पत्र  घेऊन साताऱ्यात आंदोलकांची भेट घेतली यावेळी झालेल्या कार्यक्रमात सरकारचे  दूत म्हणून आलेले अतुल सावे यांनी  सरपंच परिषद मुंबई  महाराष्ट्रआणि रयत क्रांती संघटनेच्या सर्व मागण्या बाबत सरकार सकारात्मक आहे येत्या पंधरा दिवसात यासंदर्भात मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री  यांच्या सोबत मुंबईत एक बैठक घेतली जाईल आणि या मागण्या मान्य केल्या जातील असे आश्वासन दिल्याने सरपंच परिषदेचे   प्रदेशाध्यक्ष दत्ताभाऊ काकडे यांनी आपल्या सहकाऱ्यांशी चर्चा करून आपण हे आंदोलन स्थगित करीत असल्याची घोषणा केली कराड मधून निघालेली ही पदयात्रा चार दिवसानंतर साताऱ्यात पोहोचली होती. साताऱ्यात सरपंच परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी राज्यातील सरपंचांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवून परिषद

स्नेहबंधतर्फे ऐतिहासिक वास्तुंच्या प्रतिमा भेट देऊन शहराचा वारसा जीवंत ठेवण्याचे काम...

इमेज
अहमदनगर (प्रतिनिधी) - नगरचा ऐतिहासिक वारसा व मागील ५३४ वर्षांचा इतिहास विविध शासकीय कार्यालये व अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न स्नेहबंध सोशल फौंडेशनचे अध्यक्ष डॉ. उद्धव शिंदे यांनी केला आहे. नगरच्या ऐतिहासिक वास्तूंची छायाचित्रे काढून ती शहर स्थापनादिनानिमित्त नगर शहरातील विविध उच्चपदस्थ अधिकाऱ्यांना भेट देतात. यातून आपल्या शहरास असलेला ऐतिहासिक वारसा वेगळ्या रूपात जीवंत ठेवण्याचे काम डॉ. शिंदे करत आहेत.* *छावणी परिषदेचे अध्यक्ष ब्रिगेडियर रसल डिसूजा यांना स्नेहबंधचे अध्यक्ष डॉ. उद्धव शिंदे नगर शहर स्थापनादिनानिमित्त  निजामशाहीतील जलमहाल आणि गार्डन पॅव्हॅलियन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ऐतिहासिक फराहबक्ष महालाची प्रतिमा भेट दिली. यावेळी छावणी परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विक्रांत मोरे उपस्थित होते. नगर शहर व जिल्ह्यात अनेक ऐतिहासिक ठिकाणे आहेत. भुईकोट किल्ला, चांदबिबी महाल, फराहबक्ष महाल, बेहस्तबाग महल, दमडी मशीद ही ठिकाणे प्रसिद्ध आहेत. दगडी बांधकामातील जुन्या ऐतिहासिक वास्तू भग्नावस्थेत पोहोचल्या तरी तेथे घडलेल्या ऐतिहासिक घटनांची साक्ष मात्र त्या देतातच. हा ऐतिहासिक वारसा जतन

पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते पद्मश्री ग.दि.माडगूळकर स्मारक कामाचा शुभारंभ.

इमेज
पुणे( प्रतिनिधी): पुणे महानगरपालिकेतर्फे कोथरूड येथे उभारण्यात येणाऱ्या पद्मश्री ग. दि. माडगूळकर स्मारक कामाचा शुभारंभ राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमाला आमदार भीमराव तापकीर, मनपा आयुक्त विक्रम कुमार, अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, सुमित्र माडगूळकर, प्राजक्ता माडगूळकर, माधुरी सहस्त्रबुद्धे आदी उपस्थित होते. यावेळी बोलताना पालकमंत्री श्री.पाटील म्हणाले, गीतरामायणामुळे समाजाला रामायण सुलभपणे समजले. अशा साहित्यकृतीचे रचनाकार असलेल्या गदिमांचे स्मारक केवळ कवी-लेखकाचे स्मारक नसून त्यांच्याप्रती असलेली ही श्रद्धा आहे.  माडगुळकर कुटुंबियांच्या सूचनेनुसार आवश्यकता असल्यास स्मारकासाठी अधिकचा निधी उपलब्ध करून देण्यात येईल आणि गदिमांच्या कार्याला साजेसे स्मारक उभारण्यात येईल. अनेक साहित्यप्रेमी श्रद्धेने हे स्मारक पूर्ण झाल्यावर भेट देतील. महापालिकेने  स्मारकाचे काम एक वर्षात पूर्ण करावे, असे निर्देश त्यांनी दिले. आमदार तापकीर म्हणाले, गदिमांनी साहित्य क्षेत्रात मोलाचे योगदान दिले. त्यांच्यासारख्या थोर साहित्

शेतकऱ्यांचे महावितरण विरोधात ट्रांसफार्मर समोर बोंबाबोंब आंदोलन.

इमेज
                                                                                                       नगर  (रफिक शेख) :- नगर तालुक्यातील चिचोंडी पाटील,येथील सांडवा फाटा. काळे वस्ती येथे मागील पंधरा दिवसांपूर्वी भर उन्हाळ्यात शेतीला वीजपुरवठा करणारा, ट्रांसफार्मर जळाला. त्यामुळे विजेच्या अभावी शेतकऱ्यांना अनेक प्रश्नांना सामोरे जावे लागत असल्याने तसेच त्या ठिकाणी नैसर्गिक पाण्याचा साठा उपलब्ध नसल्याने शेतीचे तसेच मुक्या प्राण्याना पिण्याचे पाण्याची व्यवस्था नसल्याने मोठी समस्या निर्माण झाली होती. ट्रांसफार्मर जळाल्यानंतर जन आधार सामाजिक संघटनेच्या वतीने तसेच शेतकऱ्यांनी महावितरण अहमदनगर यांच्या ऑफिसला जवळपास ३ ते ४ वेळा तक्रार केली. महत्त्वाचे म्हणजे ट्रांसफार्मर खराब झालाय याची माहिती अनेक दिवस महावितरणाच्या कार्यालयास महावितरणच्या कर्याचाऱ्यानी मुख्य कार्यालयाच्या अधिकाऱ्यांना कळवली नसल्याने शेतकऱ्यांच्या वतीने मागील ३ दिवसांपूर्वी महावितरणचे प्रमुख यांच्या कार्यालयावर जाऊन बसल्यानंतर त्यांनी तातडीने आपल्या अधिकाऱ्यांना या ठिकाणी ट्रांसफार्मर देण्यासाठी कळवले आणि हा सदरचा ट्रांसफार्म

निळवंडे धरणातून ३१ मे रोजी पाणी सोडण्याची चाचणी.

इमेज
  शिर्डी ( प्रतिनिधी) - उत्तर अहमदनगर जिल्ह्याला वरदान ठरणाऱ्या निळवंडे धरणाच्या  कालव्यातून पाणी सोडण्याची चाचणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत ३१ मे २०२३ रोजी घेण्यात येणार आहे.  पाच तालुक्याचे लाभक्षेत्र असलेल्या शेतकऱ्यांसाठी हा ऐतिहासिक क्षण असणार आहे. अशी माहिती महसूल, पशुसंवर्धन, दूग्ध व्यवसाय विकासमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज येथे दिली.‌  अकोले तालुक्यातील निळवंडे धरणाच्या कार्यस्थळावर महसूलमंत्री #राधाकृष्ण_विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली अधिकारी - कर्मचाऱ्यांची आढावा बैठक घेण्यात आली.  यावेळी जिल्हाधिकारी सिध्दराम सालीमठ, जलसंपदा विभागाचे अभियंता अरूण नाईक,  पोलीस उपअधीक्षक नारायण वाकचौरे,  सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता श्रीनिवास वर्पे,  कृषी विभागाचे श्री.गायकवाड,  माजी मंत्री मधुकरराव पिचड, वैभव पिचड,  सिताराम भांगरे, सोनाली नाईकवाडी,  शिवाजीराव धुमाळ यांच्यासह पदाधिकारी, शेतकरी , कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत  ३१ मे रोजी २०२३ सकाळी १० वाजता होणाऱ्या कार्यक्रम

नगर शहराचा ५३३ वा वाढदिवस.

इमेज
नगर( अशोक तांबे):- २८ मे अहमदनगर शहराचा ५३३ वा स्थापना दिन म्हणजे काय? म्हणजे या शहराचा वाढदिवस ना! कोणाही सच्च्या नगरकराला  अभिमान वाटावा असाच दिवस. अगदी सुरुवातीपासूनच या शहराची तुलना बगदाद,कैरो सारख्या त्या काळातील सुंदर शहरांशी केली जायची.  काळाच्या ओघात कसे कुणास ठाऊक पण आक्रमकांच्या हल्ल्यात हे शहर बकाल झालं खरं तर आजच्या ५३२ व्या वर्धापन दिवशी ते बकालपण घालवून या शहराची तुलना ईतर सुंदर शहरांशी कशी करता येईल याचा विचार प्रत्येक सच्च्या नगरकरांनी केला पाहिजे. खरे तर अनेक चांगल्या घटनांची सुरुवात ही नगर शहरापासून झाली अगदी उदाहरणच द्यायचं म्हटलं तर खापरी नळ योजनाही नगर शहराने इतर शहरांना पुरवलेली संकल्पना म्हटलं तर अगदीच वावगं ठरणार नाही.अगदी अलीकडच्या काळातील उदाहरण म्हटलं तर नगर-पुणे बस सेवा नगर शहरातून सुरू झाली. अशी कितीतरी उदाहरणे देता येतील.मात्र आज नगर शहराला सर्वात मोठे खेड असं काही नतद्रष्ट माणसे हिणवत राहतात.मान्य आहे, की आज शहरातला एकही रस्ता धड नाही.पाणीपुरवठा योजनेचे तीनतेरा वाजलेले आहेत.मात्र आजच्या या दुरावस्थेला नेमके जबाबदार कोण? असा प्रश्न विचारला तर त्याचे उत्तर

फरार असलेला अट्टल गुन्हेगार कॅम्प पोलीसांकडून जेरबंद !

इमेज
नगर ( प्रतिनिधी) :- दिनांक 20/02/2023 रोजी फिर्यादी यांचा चुलत भाऊ याने फिर्यादी यांचे घरात अनाधिकृत पणे प्रवेश करून पैसे मागीतले असता त्यावर फिर्यादी यांनी नकार दिल्याने आरोपी नामे अभिलेख धर्मेंद्र वाघेला रा. नेहरू कॉलनी, भिंगार ता. जि. अहमदनगर याने फिर्यादीस शिवीगाळ करून फिर्यादी यांचे घरातील टेबल वर ठेवलेल्या पर्समधील रोख रक्कम बळजबरीने काढून घेतले व तु जर पोलीस स्टेशनला फिर्याद दिली तर पाहून घेईल अशी धमकी दिले बाबत कॅम्प पो स्टे गु र नं 117/2023 भादवि कलम 452,324,504,506 प्रमाणे दि. 21/02/2023 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. घटना घडले दिनांकापासून सदरचा आरोपी हा फरार होता. तसेच सदर आरोपी विरूद्ध कोतवाली पोलीस स्टेशन गुन्हा रजि. नं 117/2023 भा द वि कलम 364, 365,452,323, 504,503,34 प्रमाणे गुन्हा दाखल असून सदर गुन्ह्यात सुद्धा आरोपी नामे अभिलेख धर्मेद्र वाघेला गुन्हा घडले दिनांकापासून फरार होता... दि. 25/05/2023 रोजी कॅम्प पो स्टे चे सपोनि. श्री. दिनकर मुंडे सो यांना गोपनिय बातमी दारा मार्फत बातमी मिळाली कि फरार आरोपी नामे अभिलेख धर्मेंद्र वाघेला हा पंचशील नगर, नगर पाथर्डी रोड परी

समृद्धी महामार्ग महाराष्ट्राचे भाग्य बदलणारा ठरणार !

इमेज
शिर्डी- हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गामुळे राज्याचे २४ जिल्हे जोडले जाणार आहेत. विकासाचा हा महामार्ग महाराष्ट्राचे भाग्य बदलणारा ठरणार आहे. डिसेंबर २०२३ पर्यंत समृद्धी महामार्गाचा शेवटचा टप्पा पूर्ण करण्यात येईल. त्याचबरोबर येत्या काळात राज्यात समृद्धी सारखे अनेक प्रकल्प‌ राज्यात राबविण्यात येतील. राज्यातील सर्व जिल्हे द्रुतगती महामार्गाने जोडण्यात येतील. अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे दिली. जेऊर कुंभारी (ता.कोपरगाव) शिर्डी पथकर प्लाझा येथे हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाच्या शिर्डी ते भरवीर (ता. इगतपुरी) या ८० किलोमीटर लांबीच्या दुसऱ्या टप्प्याचे लोकार्पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल,पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, खासदार सदाशिवराव लोखंडे, खासदार डॉ.सुजय विखे पाटील, आमदार राम शिंदे, आ.नरेंद्र दराडे, आ.मोनिका राजळे, राज्याचे मुख्य सचिव मनोज सौनिक, मुख्यमंत्र्याचे प्रधान स

पालकमंत्री वॉररूमचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्‍या हस्‍ते उद्घाटन.

इमेज
          अहमदनगर -  केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या विविध योजना, विकासाचे प्रकल्प यांच्या अंमलबजावणी आणि निगराणीसाठी अहमदनगर जिल्हास्तरावर येथे निर्माण करण्यात आलेल्या पालकमंत्री वॉररुमचे उद्घाटन राज्याचे उपमुख्यमंत्री #देवेंद्र_फडणवीस  यांच्या हस्ते करण्यात आले.             यावेळी महसूल, पशुसंवर्धन,दुग्धविकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, आमदार प्रा. राम शिंदे, आमदार मोनिकाताई राजळे, आमदार बबनराव पाचपुते, विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, अपर जिल्हाधिकारी सुहास मापारी आदी उपस्थित होते.             जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पाचव्या मजल्यावर या नियंत्रण कक्षाची निर्मिती करण्यात आली आहे. आधुनिक तंत्रज्ञान आणि सुविधा यांनी हा कक्ष सुसज्‍ज करण्यात आला आहे. अपर जिल्हाधिकारी मापारी यांनी उपमुख्यमंत्री फडणवीस यांना पालकमंत्री नियंत्रण कक्षाच्या कामकाजाविषयी सविस्तर माहिती दिली.

व्ही.आय.पी. शासकीय विश्रामगृहाच्या इमारतीचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते भूमिपूजन.

इमेज
 अहमदनगर-  व्ही.आय.पी. शासकीय विश्रामगृहाच्या इमारतीचे  भूमिपूजन उपमुख्यमंत्री #देवेंद्र_फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले.   यावेळी महसूलमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, खासदार सुजय विखे-पाटील, आमदार बबनराव पाचपुते, आमदार प्रा.राम शिंदे, आमदार मोनिकाताई राजळे, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष शिवाजी कर्डीले, विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, पोलीस अधीक्षक राकेश ओला, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता भरतकुमार बविस्कर आदी उपस्थित होते.  10 कोटी 88 लक्ष रुपये खर्चून उभारण्यात येत असलेल्या निधीतून दोन मजली सुसज्ज इमारत उभी होत आहे. पहिल्या मजल्यावर 2 व्ही.व्ही.आय.पी. तर एक व्ही.आय.पी.सूट, मिटिंग हॉल, डायनिंग हॉल स्वागत कक्ष आदी तर दुसऱ्या मजल्यावर 2 व्ही.व्ही.आय.पी. तर 3 व्ही.आय.पी.सूट उभारण्यात येणार आहे. 75 व्यक्तींची क्षमता असलेल्या सभागृहाचाही यामध्ये समावेश आहे.

स.पो.नि.शिशिरकुमार देशमुख यांना सामाजिक कार्याबद्दल धर्मवीर संभाजी महाराज व पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार प्रदान.

इमेज
नगर ( प्रतिनिधी) :- स्व.पै. किसनराव डोंगरे बहुउद्देशीय संस्था व श्री नवनाथ युवा मंडळ व धर्मवीर ग्रामीण सार्वजनिक वाचनालय निमगाव वाघा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित धर्मवीर संभाजी महाराज व पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीनिमित्त नगर तालुका पोलीस स्टेशनचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक शिशिरकुमार देशमुख धर्मवीर संभाजी महाराज व पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, स्व.पै. किसनराव डोंगरे बहुउद्देशीय संस्था व श्री नवनाथ युवा मंडळ व धर्मवीर ग्रामीण सार्वजनिक वाचनालय निमगाव वाघा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित धर्मवीर संभाजी महाराज व पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीनिमित्त जिल्हास्तरीय काव्यसंमेलन व होरपळ या पुस्तकाचे प्रकाशन श्री शिशिरकुमार देशमुख, सहाय्यक पोलीस निरीक्षक नगर तालुका पोलीस स्टेशन यांच्या हस्ते अमोलज्योत लॉन नगर- कल्याण रोड येथे संपन्न झाला. या कार्यक्रमाच्या निमित्त श्री शिशिरकुमार देशमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक यांना त्यांनी केलेल्या विविध सामाजिक कार्याबद्दल त्यांना धर्मवीर संभाजी महाराज व पुण्यश्लोक अहिल

नगर-सोलापूर राष्ट्रीय महामार्गाचे काम संथगतीने सुरु असल्याने अपघात मालिका सुरूच.

इमेज
नगर (प्रतिनिधी) - नगर सोलापूर राष्ट्रीय महामार्गाचे काम गेल्या एक वर्षापासून सुरू आहे. चांदणी चौक ते रुईछत्तीसी या दरम्यान रस्ता कामात योग्य नियोजन नसल्याचे पुन्हा पुन्हा समोर येत आहे. शिराढोण गावत एका दिवसातला हा दुसरा अपघात झाला आहे.‌माल वाहतुक  ट्रक क्रमांक के.ऐ ५६-५९८६ असा आहे . यात सुदैवाने कोणत्याही प्रकारची जीवीत हानी झाली नाही.  मालवाहतूक ट्रकचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या ठिकाणी कामाच्या ठिकाणी निर्देश देणारे अधिकारी कर्मचारी अभाव प्रामुख्याने जाणवतं आहे. हे कामं मुख्य ठेकेदार कडुन खालच्या स्तरावर उप ठेकेदार उप ठेकेदार कडुन खालच्या स्तरावर स्थानिक ठेकेदार काम वाटप केले आहे. या मुळे चांदणी चौक ते रुईछत्तीसी या मधील भागात कामा नियोजन नसल्याचे अपघात प्रमाण वाढत चालले आहे. दहिगाव येथील शिंदे   नामक नोकरदार आपल्या कार्यालयातुन घरी जात असताना साकत खुर्द येथील उड्डाणपूल जवळुन दुचाकीवरून जात असतानच्या दरम्यान सिमेंटी ब्लॉक हा हाता वर  पडला त्या अपघात त्या नागरिकांच्या हाताला मोठ्या प्रमाणावर मुका मार लागला ही घटना लक्षात येताच वरच्या बाजूला जेसीबी चालक दुसऱ्या बाजूनी पळून गेल

नगरमधे ४ बोगस अग्निवीरांना अटक !

इमेज
अहमदनगर – अग्नि वीर म्हणून प्रशिक्षण घेण्यासाठी बनावट कॉल लेटर दाखवून नगरमधील प्रशिक्षण केंद्रावर प्रशिक्षण घेण्यासाठी आलेल्या चार बोगस अग्निवीरांना लष्कराच्या अधिकाऱ्यांनी पकडून त्यांच्यावर भिंगार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. समजलेल्या माहितीनुसार भारतीय  सैन्य दलात अग्निवीर म्हणून भरती झाल्याचे बनावट कॉल लेटर घेवून नगरमधील लष्कराच्या प्रशिक्षण केंद्रावर प्रशिक्षण घेण्यासाठी आलेल्या चौघा बोगस अग्निवीरांना लष्कराच्या अधिकार्‍यांनी पकडले असून. या चौघांसह त्यांना बनावट कॉल लेटर तयार करुन देणारे दोघे अशा ६ जणांवर भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  लष्कराचे अधिकारी सुभेदार शिवाजी Sunday काळे (आयटी बटालियन एम आयसी अ‍ॅण्ड एस, सोलापूर रोड, नगर) यांनी भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून. यामधे म्हटले आहे की, आमच्या बटालियनमध्ये देशभरात अग्निवीर म्हणून भरती झालेले युवक प्रशिक्षणासाठी येत असतात. त्यानुसार मंगळवारी (दि.२३ मे) रात्री १० वाजण्याच्या सुमारास उत्तरप्रदेशातील प्रयागराज जिल्ह्यातील आदर्श नांगेलाल कुशावह (वय १९), मोहितकुमार माणिकलाल

भाजप कार्यकर्त्यांनी सेतूचे काम करावे - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.

इमेज
                                                                                       अहमदनगर (प्रतिनिधी) संपूर्ण जगाने आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वैश्विक नेते मानले असून आता आपल्यावर ही जवाबदारी आहे की या आपल्या नेत्यांनी गरीब कल्याणसाठी किती मोठे काम मागील 9 वर्षात केले आहे. आणि या करिता तुम्हाला सेतु होण्याची गरज असल्याचे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. ते अहमदनगर येथे आयोजित भाजप पदाधिकारी मेळाव्यात  बोलत होते.  यावेळी व्यासपीठावर महसूल, पशू संवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, आमदार बबनराव पाचपुते, मोनिकताई राजळे,राम शिंदे, जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजीराव कर्दीले, खा.डॉ.सुजय विखे पाटील जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे,महेंद्र गंधे यांची उपस्थिती होती.      यावेळी बोलताना फडणवीस म्हणाले की सध्या आलीबाबा आणि चाळीस चोर हे एकत्र येवून मोदीजी यांना विरोध करण्यासाठी आघाडी करत आहेत, परंतु त्यांना या गोष्टीच भान राहिले नाही की आता आपले पंतप्रधान हे विश्वाचे नेते झाले आहेत. त्यांना महासत्ता देश हे वाकून आदराने आपले बॉस म्हणत

बुऱ्हानगर पेयजल योजनेचा नगर सोलापूर रोडच्या कामाने खेळ खंडोबा...

इमेज
नगर प्रतिनिधी - नगर तालुक्यातील दक्षिण भागातील गावांना बुर्हानगर पेयजल योजना वरदान ठरलेली योजना आहे. परंतु नगर सोलापूर रस्त्याच्या चुकीच्या पद्धतीने खोदकामात दर दोन दिवसाला फुटत आहे.  नगर तालुक्याचे त्या वेळी या भागाचे आमदार शिवाजीराव कर्डिले हे होते. त्यांवेळी कार्यकाळात या पाईपलाइन साठी  पाठपुरावा मुळे नगर तालुक्यातील दक्षिण गावाला बुर्हानगर पेयजल योजना झाली. या पाईप लाइन कडे जिल्हा परिषद अधिकारी कर्मचारी जाणिवपूर्वक दुर्लक्ष करत आहे. तसेच नगर तालुक्यातील पुढारी नेते दुर्लक्ष केल्याने वाळुंज, पारगाव, शिराढोण, दहिगाव, साकत खुर्द,वाटेफळ, रुईछत्तीसी, हातवळण, मठपिप्रि,अंबिलवाडी, गुंणवडी, या गावांना पिण्याचे पाणी समस्या भेडसावत आहे. या गावातील नागरिकां पिण्याचे पाणी समस्या भेडसावत आहे. तसेच खाजगी पाणी फिल्टर वर पस्तीस लिटर कॅन तिस रुपयांना पडत आहे.पाणी पट्टी भुर्दड सोसावा लागत आहे.दहिगाव मधील नागरिकांना आरोग्याच्या समस्या जाणवत आहे.यात अतिसार,पोट दुखी, उलटी अशा समस्या जाणवत आहे. दहिगाव ग्रामपंचायतचे जलशुद्धीकरण केंद्राचे पाणी तपासणी आरोग्य विभागाने करणं गरजेचं आहे. तरी नगर सोलापूर रस्त्या

अखेर साकळाई योजनेचा सर्वेक्षण कार्यारंभ आदेश जारी...

इमेज
नगर - गेल्या तीस वर्षापासून बहुचर्चित साकळाई उपसा सिंचन योजनेच्या सर्वेक्षणाचा कार्यारंभ आदेश निघाला आहे. यासंबंधीचे पत्र खासदार सुजय विखे पाटील, जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजी कर्डिले, आमदार बबनराव पाचपुते, साकळाई कृती समितीच्या उपस्थितीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबंधित ठेकेदार संस्थेला नगरमध्ये दिले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शासकीय विश्रामगृह भूमिपूजन, आढावा बैठक, विविध विकास कामांच्या उद्घाटनासाठी नगरमध्ये आले होते. याप्रसंगी जिल्हाधिकारी कार्यालय येथे झालेल्या बैठकीदरम्यान साकळाई उपसा सिंचन योजनेच्या सर्वेक्षणाचा कार्यारंभ आदेशाचे पत्र संबंधित ठेकेदार संस्थेला देण्यात आले. साकळाई योजना मार्गी लागण्यासाठी साकळाई कृती समितीने वेळोवेळी आमदार, खासदार व मंत्रालय स्तरावर पाठपुरावा केला होता. तसेच खासदार सुजय विखे पाटील, आमदार बबनराव पाचपुते, जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजी कर्डिले यांच्या पाठपुराव्याला यश आले असून साकळाई उपसा सिंचन योजनेचा लाभक्षेत्रातील शेतकर्‍यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. साकळाई उपसा जलसिंचन योजनेसाठी खा. डॉ. सुजय विखे प्रयत्नांची पराकाष्ठा करत होते. सप्

भर उन्हाळ्यात कामरगावकरांची पाण्यासाठी वणवण.

इमेज
नगर (प्रतिनिधी) – कामरगाव ता. नगर येथे सध्या कृत्रिम पाणीटंचाई निर्माण झाली आहे, कामरगावला पाणीपुरवठा केला जाणाऱ्या तलावामधे मुबलक पाणी साठा उपलब्ध आहे. परंतु कामरगाव ग्रामपंचायतची पाणीपुरवठा नियोजनाबाबत उदासिनता दिसून येत  असल्याने प्रशासनाच्या कारभारावर ग्रामस्थांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे. तसेच  मुळा डॅम कनेक्शन देखील बंद असल्याने ही समस्या निर्माण झाली आहे. त्यामुळे गावकऱ्यांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. ग्रामस्थांना वारंवार पाणी विकत घेण्याची वेळ आल्याने आर्थिक भुर्दंड देखील सोसावा लागत आहे.    कामरगाव हे नगर-पुणे महामार्गावर असलेले महत्वाचे गाव असून गावाची लोकसंख्या सुमारे ४५०० हजारच्या आसपास आहे, मात्र सध्या ऐन उन्हाळ्यात गावाचे मुळा डॅम कनेक्शन बंद झाल्याने व गावातील पाणी पुरवठा तलावात मुबलक पाणी पुरवठा असताना देखील पाणी पुरवठा नियोजनाबाबत ग्रामपंचायत प्रशासनाची उदासिनता यामुळे गावात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. उन्हातान्हात महिला वर्गाला पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. त्यामुळे महिला वर्ग व ग्रामस्थांचे अतोनात हाल सुरु आहे, पाणी विकत घेण्याची वेळ ग्रामस्थांवर आ

शुभमंगल जुळवताना सावधान... नगर जिल्ह्यात नवरदेव बोहल्यावर चढण्याआधी जेलमधे !

इमेज
अहमदनगर ( प्रतिनिधी) : विवाह सोहळा म्हटल कि वधू वर पक्षासाठी आनंदाचा क्षण.  परंतु अहमदनगर जिल्ह्यात एक विवाह सोहळा वेगळयाच कारणामुळे चर्चेत आला आहे. नगर जिल्ह्यातील असाच एक विवाह सोहळा अगदी रंगात आला होता…दोन्ही बाजूकडील नातेवाईकांच्या गर्दीने मंगल कार्यालय खचाखच भरले होते… सर्वत्र लगीन घाई सुरु होती.लग्न घटिका समीप आली होती, परंतु अचानक विवाहस्थळी पोलिसांची एंट्री झाली आणि नवरदेव बोहल्यावर चढण्याऐवजी थेट जेलमध्ये पोहोचला.  या घटनेची जिल्हाभरात चांगलीच चर्चा रंगू लागली आहे. याबाबतची सविस्तर माहिती अशी की, अहमदनगर जिल्ह्यातील  राहाता येथील एका मुलीचा विवाह नाशिक मधे राहणाऱ्या पंकज याच्याशी ठरला होता.  राहाता येथील एका मंगल कार्यालयात २१ मे रोजी विवाह असल्याने या विवाह सोहळ्याची जय्यत तयारी करण्यात आली होती. लग्न घटिका समीप आल्याने दोन्ही बाजूकडील नातेवाईक आणि मित्र परिवाराचा उत्साह शिगेला होता. नवरदेव पंकज वाजतगाजत विवाहस्थळी पोहचला. मात्र तो बोहल्यावर चढण्या अगोदरच त्याची  प्रियसी राहाता पोलिसांसह विवाहस्थळी पोहचली. पंकज याने लग्नाचे आमिष दाखवून चार वर्षांत वारंवार शरीरसंबंध ठेवून फसवण

सुपा एमआयडीसीतील वायुप्रदूषण रोखा; अन्यथा खळखट्याक आंदोलन !

इमेज
पारनेर/प्रतिनिधी : पारनेर तालुक्यातील नगर पुणेे महामार्गा लगत असणाऱ्या सुपा एम आय डी सी मध्ये गणराज इम्पॅक्ट प्रा. लि. ही कंपनी वाघुंडे खुर्द हद्दीत नगर-पुणे हायवे रोड लगत आहे. या कंपनीतून न घणारा धूर खूप घातक आहे. त्या धुरा मधून  खूप घातक बर आणि खाक ही महामार्गावर व परिसरातील येणाऱ्या जाणाऱ्या गाडीतील प्रवासी तसेच शेतकऱ्यांच्या पिकावर आणि शेजारील हॉटेल वरील अन्न पदार्थावर बसते आणि हे अन्न खाल्ल्यावर शरीरावर घातक परिणाम होत असल्याने कंपनी व्यवस्थापनाने हे घातक असे वायू प्रदूषण रोखावे अन्यथा मनसे स्टाईल खळखट्याक आंदोलन केले जाईल असा इशारा मनसेचे पारनेर तालुका उपाध्यक्ष रविश रासकर यांनी दिला आहे. दरम्यान संबंधित कंपनी ही नगर-पुणे हायवे लगत असून शेती असलेल्या शेतीमालावर व फळबागांवर त्या धुराची खाक व बर बसते व त्यामुळे शेतकऱ्यांचे पिके आणि फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. सदर ही कंपनी घातक धूर  हवेत सोडते. यामुळे अनेकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. सदर कंपनी ही रस्ता लगत न ठेवता ही कंपनी आऊट साईडला स्थलांतरित करावी जेणेकरून आजूबाजूच्या शेतकऱ्यांना व व्यावसायिकांना त्याचा त्रास

फॉलोअर