पोस्ट्स

गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजे आणि लेझर ला बंदी- आदेशाचा भंग केल्यास कडक कारवाई ; आपल्या भारतीय संस्कृतीतील पारंपारिक वाद्याचा वापर करावा-जिल्हा पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन.

इमेज
  अहिल्यानगर/प्रतिनिधी - जिल्ह्यातील गणेश मंडळांनी गणेश विसर्जन मिरवणुकीत ध्वनी प्रदूषणासह  नियमांचे पालन करावे. प्लाझ्मा-लेझरचा वापर करू नये तसेच मोठ्या आवाजातील डीजे न वाजवता पारंपरिक वाद्यांचा वापर करावा. सर्वोच्च न्यायालयाने घालून दिलेल्या नियमांचा भंग करून ध्वनी प्रदूषण केल्यास नियमानुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा  इशारा जिल्हा पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी दिला. Adv  अहिल्यानगर शहरासह जिल्ह्यात सार्वजनिक गणेश मंडळांकडून गणरायाचे स्वागत करताना अनेक मंडळांनी पारंपरिक वाद्यांना प्राधान्य देत तसेच कमी आवाजातील साऊंड सिस्टीमचा वापर करीत  पोलिसांना सहकार्य केले. आता गणेश विसर्जन मिरवणुकीची तयारी सुरू झाली असून, गणेश विसर्जन मिरवणुका मोठ्या प्रमाणावर निघणार आहेत. या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून नियमांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. गणेश विसर्जन मिरवणुकीत मोठ्या आवाजातील डीजे, प्लाझ्मा-लेझर आणि ध्वनी प्रदूषणाचा मुद्दा यावर्षी जिल्ह्यातील प्रत्येक पोलीस ठाण्याच्या स्तरावर सार्वजनिक गणेश मंडळांचे पदाधिकारी, मंडळांचे प्रमुख तसेच डीजे चालक व मालक या...

जनावरांसाठी चारा छावणी सुरू करण्याची भोरवाडी ग्रामस्थांची मागणी. सामाजिक कार्यकर्ते योगेश पानसरे यांचे विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांना निवेदन.

इमेज
अहिल्यानगर /प्रतिनिधी: नगर तालुक्यातील मौजे भोरवाडी परिसरात निर्माण झालेल्या दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर जनावरांसाठी तातडीने चारा छावणी अथवा चारा डेपो सुरू करण्यात यावा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते योगेश पानसरे तसेच प्रगतशील शेतकरी प्रदीप वाघ व बापूसाहेब वायळ यांनी विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम यांना निवेदन देत केली आहे. यावेळी कामरगाव येथे आयुक्तांनी दिलेल्या भेटीवेळी अप्पर जिल्हाधिकारी शैलेश हिंगे, अपर तहसिलदार ढवळे,नायब तहसिलदार अभिजित वांढेकर महसूल कर्मचारी ग्रामस्थ शेतकरी उपस्थित होते.  Adv  याबाबत निवेदन देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की, भोरवाडी परिसरात पावसाचे प्रमाण अत्यल्प राहिल्याने शेतीतील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्याचबरोबर जनावरांसाठी आवश्यक असलेल्या हिरव्या व वाळलेल्या चाऱ्याची उपलब्धता कमी झाली आहे. परिणामी परिसरातील पशुपालक शेतकऱ्यांसमोर जनावरांच्या संगोपनाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. पशुपालकांकडे शेती व पशुपालन हेच प्रमुख उत्पन्नाचे साधन असून, सध्या जनावरांना पुरेसा चारा उपलब्ध होत नसल्याने पशुधनाच्या उत्पादनक्षमतेवर परिणाम ह...

जनावरांसाठी चारा छावणी सुरू करण्याची भोरवाडी ग्रामस्थांची मागणी. सामाजिक कार्यकर्ते योगेश पानसरे यांचे तहसीलदारांना निवेदन.

इमेज
अहिल्यानगर /प्रतिनिधी: नगर तालुक्यातील मौजे भोरवाडी परिसरात निर्माण झालेल्या दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर जनावरांसाठी तातडीने चारा छावणी अथवा चारा डेपो सुरू करण्यात यावा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते योगेश पानसरे तसेच प्रगतशील शेतकरी प्रदीप वाघ व बापूसाहेब वायळ यांनी विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम यांना निवेदन देत केली आहे. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी शैलेश हिंगे, अपर तहसिलदार ढवळे,नायब तहसिलदार अभिजित वांढेकर उपस्थित होते.  Adv  याबाबत तहसीलदार  नगर यांच्या नावे निवेदन देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की, भोरवाडी परिसरात पावसाचे प्रमाण अत्यल्प राहिल्याने शेतीतील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्याचबरोबर जनावरांसाठी आवश्यक असलेल्या हिरव्या व वाळलेल्या चाऱ्याची उपलब्धता कमी झाली आहे. परिणामी परिसरातील पशुपालक शेतकऱ्यांसमोर जनावरांच्या संगोपनाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. पशुपालकांकडे शेती व पशुपालन हेच प्रमुख उत्पन्नाचे साधन असून, सध्या जनावरांना पुरेसा चारा उपलब्ध होत नसल्याने पशुधनाच्या उत्पादनक्षमतेवर परिणाम होण्याची शक्यता आहे. जनावरांना चारा उपलब्ध...

सेवानिवृत्त अंगणवाडी सेविका पुष्पाताई सोनवणे यांचा कौतुकास्पद उपक्रम. सामाजिक बांधिलकी जपत कामरगाव जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप.

इमेज
अहिल्यानगर(प्रतिनिधी) : तालुक्यातील कामरगाव येथील सेवानिवृत्त ज्येष्ठ अंगणवाडी सेविका पुष्पाताई सोनवणे यांनी दरवर्षीप्रमाणे यंदाही आपल्या आई-वडिलांच्या स्मरणार्थ जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करून सामाजिक बांधिलकी जपली. ADV विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आवश्यक असलेले शैक्षणिक साहित्य उपलब्ध व्हावे, त्यांना शिक्षणाची गोडी लागावी आणि आर्थिक अडचणींमुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणात अडथळा निर्माण होऊ नये, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला. पुष्पाताई सोनवणे यांच्या या उपक्रमातून ‘शिक्षण हीच खरी सेवा’ हा संदेश अधोरेखित झाला. सेवानिवृत्तीनंतरही विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजांची जाणीव ठेवून दरवर्षी आई-वडिलांच्या स्मरणार्थ शैक्षणिक साहित्य वाटप करण्याची त्यांची परंपरा कौतुकास्पद आहे. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले. या वेळी शिक्षिका सविता तवले व बेबीसरोजा ढेले, बबीता आंधळे, शीला गुगळे, शशिकला भुजबळ, पदमा सांगळे, मीना आभाने, नंदा चौरे, रंजना चौधरी, युवा नेते शिवा सोनवणे व पत्रकार हेमंत साठे यांच्यासह शाळेतील विद्यार्थी, शिक्षक, अंगणव...

शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक भान व चांगले चारित्र्य यांचा विकास होणे आवश्यक - श्री.अरविंद पारगावकर

इमेज
  अहिल्यानगर/ प्रतिनिधी:- स्वातंत्र्यानंतर भारत हा जगातील तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था झाली  असून्  आपला देश सुपरपॉवर होण्यासाठी शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक भान व चांगले चारित्र्य यांचा विकास होणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन एल अँड टी कंपनीचे उपाध्यक्ष श्री.अरविंद पारगावकर यांनी केले. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अहिल्यानगर उपकेंद्रात भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या ध्वजारोहण कार्यक्रमप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. यावेळी त्यांनी आपल्याला मिळालेले स्वातंत्र्य हे अनेकांच्या बलिदानामुळे शक्य झाले असून विद्यार्थ्यांनी  त्यांच्या त्यागाची जाणीव ठेऊन देशाच्या विकासात योगदान देण्याचे आवाहन केले. सर्वांशी संवाद साधताना अहिल्यानगर उपकेंद्राच्या सक्षमीकरणासाठी सी.एस.आर.फंडामधून विद्यार्थ्यांना आवश्यक असणारे प्रगत संगणक देण्याचे आश्वासन त्यांनी दिले.  विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य प्रा.श्री.संदीप पालवे यांनी उपकेंद्र अहिल्यानगर येथे बी.एस्स्सी. डाटा  सायन्स अभ्यासक्रमास शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना सर्व आवश्यक शैक्षणिक सु...

कामरगावातील वाढत्या चोऱ्यांबाबत पोलीस प्रशासनाला निवेदन; ८ दिवसांत उलगडा न झाल्यास रास्ता रोकोचा इशारा.

इमेज
अहिल्यानगर(हेमंत साठे) दि. १८ जुलै :-              मिळालेल्या माहितीनुसार, तालुक्यातील मौजे कामरगाव येथे सलग घडत असलेल्या चोरीच्या घटनांमुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दि. १७ जुलैच्या मध्यरात्री ग्रामदैवत श्री कामाक्षा माता मंदिरात अज्ञात चोरट्यांनी देवीचे अंदाजे अडीच ते तीन तोळे सोन्याचे दागिने व मुकुट चोरी करून मंदिराची विटंबना केली. त्याच रात्री गावातील आणखी दोन ठिकाणी घरफोडी झाली. त्यानंतर दि. १८ जुलैच्या मध्यरात्री पुन्हा शेळ्या व जनावरांची चोरी झाल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत असून या सर्व घटनांचे काही महत्त्वाचे सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध झाले असूनही आरोपी अद्याप मोकाट असल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार गट) चे तालुकाध्यक्ष सिद्धांत आंधळे , कामरगावचे युवा नेते दादा झरेकर, स्वप्नील ठोकळ, अक्षय कोल्हे, सुयोग भुजबळ, संदिप लष्करे व जय आंधळे यांच्या शिष्टमंडळाने अप्पर जिल्हा पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांची भेट घेऊन निवेदन दिले. यावेळी अधिकाऱ्य...

कामरगावात चोऱ्यांचे सत्र सुरूच ! कामरगाव ग्रामस्थांसह शेतकरी भीतीच्या छायेत...

इमेज
अहिल्यानगर( हेमंत साठे):- तालुक्यातील अहिल्यानगर-पुणे महामार्गालगत असणाऱ्या कामरगाव मधे ग्रामदैवत तथा प्रसिद्ध कामक्षा माता मंदिरात १७ जुलै रोजी रात्री झालेली धाडसी चोरीची घटना ताजी असतानाच पुन्हा १८ जुलै रोजी रात्री मंदिरापासून काही अंतरावर राहणारे शेतकरी आंधळे यांच्या घरी चोरी झाली आहे.         मिळालेल्या माहितीनुसार, १८ जुलै रोजी रात्री अंदाजे दोन ते तीन वाजण्याच्या सुमारास शेतकरी चांगदेव आंधळे यांच्या अंदाजे किंमत ३००००/- रु  किंमतीच्या दोन शेळया अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्या असल्याचे चांगदेव आंधळे यांनी सांगितले.           महाराष्ट्रातील कामक्षा देवीचे एकमेव प्रसिद्ध देवस्थान कामक्षा माता मंदिरातील धाडसी चोरीची घटना ताजी असतानाच मंदिरापासून काही अंतरावर राहणाऱ्या शेतकऱ्याच्या कडे चोरी झाल्याने ग्रामस्थांमधे प्रचंड दहशतीचे व भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.          तसेच काही शेतकऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मागील काही दिवसांपूर्वी ठोकळ नामक शेतकऱ्याचे वासरू चोरीचा प्रयत्न झाला होता परंतु शेतकऱ्याच्या स...

कामरगावातील कामक्षा माता मंदिरात धाडसी चोरी... महाराष्ट्रातील कामक्षा देवीचे एकमेव प्रसिद्ध देवस्थानातील चोरीचा छडा लावण्याचे पोलीसांसमोर आव्हान ?

इमेज
  अहिल्यानगर (हेमंत साठे):- तालुक्यातील कामरगाव येथील महाराष्ट्रातील एकमेव कामक्षा देवीचे प्रसिद्ध देवस्थान कामक्षा माता मंदिरात अज्ञात चोरट्यांनी धाडसी चोरी करत अंदाजे अडीच ते तीन तोळयाचे दागिने व ऐवज चोरून नेल्याचे प्राथमिक माहितीनुसार समजते.       मिळालेल्या माहितीनुसार १७ जुलै  रात्री अंदाजे २ ते ३ च्या सुमारास अज्ञात चार चोरट्यांनी कामरगाव येथील मध्यवस्तीत असणाऱ्या प्रसिद्ध कामक्षा माता मंदिरात अंदाजे अडीच ते तीन तोळे दागिन्याची व मुकुटाची चोरी केली. CCTV फुटेज नुसार मंदिरातील गाभाऱ्यातून देवीच्या मुर्तीवरील दागिने अक्षरशः ९ सेकंदात अत्यंत अमानुषपणे ओरबाडत चोरले. चोरटे हे चेहरा रुमालाने बांधून निळी जीन्स व शर्ट वर आले असल्याचे समजते.         तसेच चोरट्यांनी मंदिराशेजारील  घरांच्या कडया लावल्या व स्टेट बँक अधिकारी सतीश सोनवणे व रज्जाक शेख यांच्या बंद घरात देखील उचका पाचक केल्याचे समजते.          चोरीची माहिती मिळाल्यानंतर नगर तालुका पोलीसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत परिस्थितीचा आढावा घेत तपासकामी श्वान पथका...

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे विदयार्थी हितासाठी महत्त्वाचे निर्णय. विद्यार्थी-संशोधकांना आंतरराष्ट्रीय स्तरावरील संशोधनाच्या संधी.

इमेज
  अहिल्यानगर(हेमंत साठे):-  सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मा. व्यवस्थापन परिषदेच्या आजच्या बैठकीत विद्यार्थी हित, सामाजिक न्याय, आंतरराष्ट्रीय शैक्षणिक सहकार्य, संशोधन विस्तार आणि पायाभूत सुविधांच्या विकासाला चालना देणारे अनेक महत्त्वपूर्ण ठराव मंजूर करण्यात आले. विद्यापीठाच्या सर्वसमावेशक आणि विद्यार्थी-केंद्रित धोरणाची प्रचिती देणाऱ्या या निर्णयांमुळे विद्यार्थ्यांसाठी नवीन संधी उपलब्ध होणार आहेत. व्यवस्थापन परिषदेमध्ये रशियातील मॉस्को येथील रशियन पीपल्स फ्रेंडशिप विद्यापीठ (आरयूडीएन), जर्मनीमधील बायरॉईथ विद्यापीठ तसेच युनायटेड किंग्डममधील ससेक्स विद्यापीठ यांच्याशी शैक्षणिक, संशोधन आणि विद्यार्थी देवाणघेवाण कार्यक्रमांसाठी सामंजस्य करारांना मान्यता देण्यात आली. या करारांमुळे विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना आणि संशोधकांना जागतिक स्तरावरील शिक्षण आणि संशोधनाच्या संधी उपलब्ध होणार आहेत. भारतीय ज्ञानपरंपरा आणि मूल्याधिष्ठित शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी पुण्यातील श्री सदगुरू समूहाच्या सहकार्याने भारतीय भाषा आणि भारतीय ज्ञान प्रणाली केंद्र तसेच भारतीय जीवनशैली आणि मूल्य ...

पालकमंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप.

इमेज
अहिल्यानगर (प्रतिनिधी): राज्याचे जलसंपदा मंत्री तथा अहिल्यानगर जिल्हयाचे पालकमंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त कामरगाव येथील डॉ. सुजयदादा विखे पाटील विचार मंचाच्या वतीने येथील विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप करण्यात आले. हा स्तुत्य उपक्रम कामरगाव इंग्लिश स्कूलच्या प्रांगणात पार पडला. यावेळी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, कामरगाव तसेच कामरगाव इंग्लिश स्कूलमधील विद्यार्थ्यांना वह्यांचे वितरण करण्यात आले.  या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी भाजपचे ज्येष्ठ नेते विनायकराव देशमुख हे होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपशिक्षण अधिकारी विलास साठे हे होते. सूत्रसंचालन शिक्षिका अमृता गायके यांनी केले.  कार्यक्रमाचे आयोजन सिद्धार्थ आंधळे व  मनोज ठोकळ  यांनी केले होते. या कार्यक्रमास,अजिंक्य झेंडे, विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन सुदाम ठोकळ,प्रगतीशील शेतकरी गोरख साठे, युवाने नेते संदीप लष्करे, मा सरपंच तुकाराम कातोरे, मा.उपसरपंच अनिल आंधळे, मा. चेअरमन शिवाजी साठे, राजेंद्र राजगुरू, अविराज ठाणगे, साहेबराव ठोकळ, बापूसाहेब शेळके, मा.ग्रा.पं.सदस्य हाबू शिंदे व विष्णू कात...

अहिल्यानगर या तालुक्यांत अन्न भेसळविरोधी मोहिमेत धडक कारवाई . आईस्क्रीम व खाद्यतेलाचा २ लाख ८४ हजार किंमतीचा साठा जप्त.

इमेज
अहिल्यानगर/प्रतिनिधी दि. ३ जून :- जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या अन्न भेसळविरोधी विशेष मोहिमेत राहुरी व नेवासा तालुक्यात कारवाई करून २ लाख ८४ हजार १८० रुपये किमतीचे संशयित आईस्क्रीम व खाद्यतेल जप्त करण्यात आले असून नागरिकांना अन्नपदार्थांच्या गुणवत्तेबाबत शंका असल्यास प्रशासनाशी संपर्क साधावा, असे आवाहन सहायक आयुक्त अन्न अ. अ. भोईटे यांनी केले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, राहुरी येथील शिवशक्ती आईस्क्रीम या आस्थापनाची तपासणी करून शिवशक्ती ब्रँडच्या आईस्क्रीम गुलकंद व अमेरिकन नट्स या उत्पादनांचे नमुने विश्लेषणासाठी घेण्यात आले. दर्जाहीन असल्याच्या संशयावरून या ठिकाणी ४१ हजार ४४० रुपये किमतीचे एकूण १४८ पॅकेट्स आईस्क्रीम जप्त करण्यात आले. तसेच नेवासा तालुक्यातील कडू गल्ली येथील संतोष किराणा स्टोअर्सची तपासणी करून एसबीजी ब्रँडच्या रिफाइंड पामोलीन ऑईल या खाद्यतेलाचा नमुना तपासणीसाठी घेण्यात आला. हा साठा संशयास्पद आढळल्याने २ लाख ४२ हजार ७४० रुपये किमतीचे १ हजार ४९८.४ किलो खाद्यतेल जप्त करण्यात आले. अन्न व औषध विभागाचे आयुक्त तुकाराम मुंडे यांच्या आदेशानुसार व सहआयुक्त श्रीकांत करकाळे यांच...

ग्रामसभेत पत्रकारावर हल्ला करून धमकी देणे पडले महागात, सरपंच समर्थक आला गोत्यात महाराष्ट्र पत्रकार संरक्षण कायद्यान्वये गुन्हा दाखल..

इमेज
  अहिल्यानगर (प्रतिनिधी) -  तालुक्यातील दहीगाव येथील ग्रामसभेत उपस्थित केलेल्या प्रश्नांवर वाद सुरु असताना त्याचे फोटो व व्हिडीओ चित्रीकरण करणाऱ्या  पत्रकाराला सरपंचाच्या समर्थकाने मारहाण करत धमकी दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी नगर तालुका पोलीस ठाण्यात महाराष्ट्र पत्रकार संरक्षण कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी पत्रकार शिवहरी  माणिक म्हस्के हे दहीगाव येथील ग्रामसभेत उपस्थित होते. यावेळी ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थ यांनी ग्रामसभेतील विषयांवरून सरपंच आणि ग्रामसेवकांना प्रश्न विचारले होते. यावरून तिथे वाद निर्माण झाला. वाढता वाद पाहून, अनुचित प्रकार घडू नये म्हणून फिर्यादी म्हस्के यांनी डायल ११२ क्रमांकावर फोन करून पोलिसांची मदत मागितली. तसेच या वादाचे फोटो आणि व्हिडीओ मोबाईल मध्ये काढले.पोलिसांना बोलावल्याचा राग आल्याने सरपंचाचा चुलतभाऊ असलेल्या आरोपी गणेश लक्ष्मण वाघ (रा. दहीगाव, ता. नगर) याने फिर्यादी म्हस्के यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. "तुला पोलिसांना फोन करण्याची काय गरज होती?" असे म्हणत आरोपींनी...

मनसे सुपा गट प्रमुखपदी प्रतीक शेळके यांची नियुक्ती. पारनेर तालुकाध्यक्ष अविनाश पवार यांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान.

इमेज
सुपा (प्रतिनीधी) -   महाराष्ट्र नवनिर्माण सेना अहिल्या नगर जिल्हा संपर्क प्रमुख नयन कदम यांच्या सुचनेनुसार व जिल्हा अध्यक्ष सचिन डफळ यांच्या मार्गदर्शनाखाली, पारनेर तालुकाध्यक्ष अविनाश पवार यांच्या हस्ते म्हसणे (सुलतानपूर) येथील प्रतीक शेळके यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सुपा गट प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली. जाहिरात... 👇🏻 या नियुक्तीप्रसंगी पारनेर तालुका सचिव श्री नारायण नरवडे पारनेर तालुका उपाध्यक्ष विरेंद्र थोरात, पारनेर शहर अध्यक्ष सतिश म्हस्के,सुपा शहर अध्यक्ष अक्षय सूर्यवंशी अजय पठारे, नितीन बागल यांच्यासह मनसेचे असंख्य महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते. नियुक्तीनंतर प्रतीक शेळके यांनी मनसे नेतृत्वाचे आभार मानत सुपा गटातील जनतेच्या प्रश्नांसाठी कटिबद्ध राहण्याचा संकल्प व्यक्त केला तसेच नगर- पुणे रोडवरील वाहतूक कोंडी व सुपा येथे उड्डाणपुलाच्या प्रश्नासाठी मनसेच्या वतीने पाठपुरावा करून महामार्ग मोकळा होईपर्यंत सातत्य पुर्ण लढा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या महाराष्ट्र सैनिकांना सोबत घेऊन सुरू ठेवण्याचा संकल्प तालुका अध्यक्ष पवार, आणि तालुका सचिव नारायण नरवडे यांनी व्यक...

12 वी विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांना करिअर करण्यासाठी बी.एस्सी. डाटा सायन्स हा उत्कृष्ट पर्याय : डॉ.दीपक हर्डीकर... पुणे विद्यापीठाच्या अहिल्यानगर उपकेंद्रात करियर मार्गदर्शनपर पालक- विद्यार्थी मेळावा सम्पन्न.

इमेज
अहिल्यानगर(हेमंत साठे):-सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ,उपकेंद्र अहिल्यानगर येथे  दि.22 मे 2026 रोजी अहिल्यानगर उपकेंद्र,बाबुर्डी घुमट परिसरातील व अहिल्यानगर शहरातील विद्यार्थी व पालक यांच्यासाठी एकदिवसीय मार्गदर्शनपर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. विद्यापीठाच्या एज्युटेक फाउंडेशन चे CEO डॉ. दीपक हर्डीकर यांनी विद्यार्थी व पालक यांना सध्याच्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात विद्यार्थ्यांना करिअरसाठी बी.एस्स्सी.डाटा सायन्स हा उत्तम व योग्य अभ्यासक्रम असल्याचे सांगितले.  यावेळी व्यवस्थापन परिषद सदस्य प्रा.संदीप पालवे यांनी  उपकेंद्रातफे विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या विविध शैक्षणिक सुविधाबद्दल माहिती देऊन प्रवेश घेण्याचे आवाहन केले.  सहायक कुलसचिव डॉ.शिवप्रसाद घालमे यांनी कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रास्ताविकात अहिल्यानगर उपकेंद्राचा आजपर्यंतचा प्रवास विषद करून प्रस्तुत अभ्यासक्रम उपकेंद्रात सुरु करण्याची विद्यापीठाची भूमिका विषद केली. यावेळी पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. डॉ.बी.के.थोरवे यांनी सदर अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर भविष्यातील नोकरीच्या सं...

शंभर टक्के जनगणना कार्य पूर्ण करणाऱ्या प्रगणक व पर्यवेक्षकांचा आयुक्तांच्या हस्ते सन्मान.

इमेज
अहिल्यानगर(हेमंत साठे) :भारत सरकारच्या वतीने देशभर सुरू असलेल्या जगातील सर्वात मोठ्या डिजिटल जनगणना मोहिमेला अहिल्यानगर महानगरपालिका क्षेत्रात वेग आला असून आयुक्त तथा मुख्य जनगणना अधिकारी यशवंत डांगे यांच्या मार्गदर्शनाखाली जनगणना २०२७ चे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. प्रत्येक प्रगणकाला ३० दिवसांचा कालावधी आणि निश्चित प्रभागनिहाय घरांची जबाबदारी देण्यात आलेली असताना काही कर्मचाऱ्यांनी अवघ्या तीनच दिवसांत जनगणनेचे १०० टक्के काम अचूक पूर्ण करत नवीन आदर्श निर्माण केला आहे. अहिल्यानगर महानगरपालिका क्षेत्रात ४२ अंश तापमानातही अवघ्या तीन दिवसांत १०० टक्के जनगणनचे कामकाज पूर्ण करणाऱ्या बुरुडगाव झोनमधील प्रगणक  व पर्यवेक्षक यांचा अहिल्यानगर महानगरपालिका आयुक्त तथा मुख्य जनगणना अधिकारी यशवंत डांगे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.यावेळी अतिरिक्त आयुक्त नागेंद्र मुतकेकर, सहायक आयुक्त मेहेर लहारे, उपायुक्त एस.बी.तडवी, अमोल कोतकर,ॠषीकेश सातपुते उपस्थित होते. प्रभाग समिती क्रमांक चार बुरुडगाव चार्ज अधिकारी एस.बी.तडवी व पर्यवेक्षक अभिजीत जोशी व योगेश गुंड यांच्या मार्गदर्शनाखाली घरयादी गट क्रमांक ...

कोतवाली पोलीस स्टेशनच्या विशाल दळवी यांना उत्कृष्ट तपासासाठी प्रशस्तीपत्र.

इमेज
अहिल्यानगर(प्रतिनिधी) : भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यातील खुनाच्या क्लिष्ट आणि आव्हानात्मक गुन्ह्याचा सखोल तपास करून आरोपींना अटक करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावल्याबद्दल कोतवाली पोलीस स्टेशनचे पोलीस हेड कॉन्स्टेबल विशाल अशोक दळवी यांना अहिल्यानगर जिल्हा पोलीस दलाच्या वतीने प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. दिनांक २७ एप्रिल २०२६ रोजी भिंगार कॅम्प पोलीस ठाणे गु.र.नं. २२२/२०२६, बीएनएस कलम १०३(१), २३८ (३)(५) अंतर्गत दाखल असलेल्या गुन्ह्याचा तपास करताना मिसिंग व्यक्ती प्रसाद रोहिदास जाधव यांचा खून झाल्याचे उघडकीस आले. आरोपींनी वाकोडी शिवारातील उसाच्या शेतात लाकडी दांडक्याने मारहाण करून त्यांचा खून करून मृतदेह टाकून दिला होता. या प्रकरणात गुप्त माहिती, तांत्रिक विश्लेषण आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास करत विशाल दळवी यांनी आरोपींचा शोध घेतला. आरोपी शुभम हरि भोसले (वय २०, रा. वाकोडीफाटा) आणि समाधान उर्फ बाळ्या रामदास सोनवणे (वय ४२, रा. बुरुडगाव) यांना अटक करून गुन्ह्याचा छडा लावण्यात आला. विशाल दळवी यांनी केलेली कामगिरी अहिल्यानगर जिल्हा पोलीस दलासाठी अभिमानास्पद असल्याचे नमूद करत, भविष...

छत्रपती अभियांत्रिकी 'च्या विद्यार्थ्यांचा राष्ट्रीय प्रोजेक्ट स्पर्धेत द्वितीय क्रमांक.

इमेज
  अहिल्यानगर(रफिक शेख): नेप्ती येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज अभियांत्रिकी महाविद्यालयामधील प्रथम वर्ष अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी बनवलेला विविध कार्य करू शकणारा मल्टी युटिलिटी रोबोट हा राष्ट्रीय स्तरावरील प्रोजेक्ट स्पर्धेचे आकर्षण बनला. AISSMS IOIT College Pune  येथे नुकत्याच झालेल्या प्रोजेक्ट स्पर्धेत राज्यासह इतर राज्यातून विविध प्रोजेक्ट सादर करण्यात आले. सुमारे 250 प्रोजेक्ट्समधून छत्रपती अभियांत्रिकीच्या प्रथम वर्षातील विद्यार्थ्यांनी यात द्वितीय क्रमांक मिळवला. नवनाथ भिंगारदिवे, पार्थ साठे, आदित्य राऊत, तनुजा व्यवहारे अशी या विजेत्यांची नावे असून याच विद्यार्थ्यांनी या आधी छत्रपती अभियांत्रिकी महाविद्यायात झालेल्या प्रोजेक्ट स्पर्धेत व डॉ. विठ्ठलराव विखे पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयातील प्रोजेक्ट स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकाविला.  जाहिरात...👇🏻 या मल्टी युटिलिटी रोबोटची वैशिष्टे म्हणजे मोबाईलवरून रोबोटला ऑपरेट करू शकतो. व्हॉईस अँड टेक्स्ट कंट्रोल, स्पीड कंट्रोल, क्रुझ कंट्रोल, रेकॉर्ड अॅन्ड प्ले पाथ, मोबाईलवरून लाइव्ह कॅमेरा स्ट्रीमिंग, हॉर्न, पुढे जात अ...

कामरगाव ग्रामपंचायत कडून दहावी गुणवंतांचा सत्कार. पदाधिकारी व ग्रामस्थांकडून विदयार्थ्याचे अभिनंदन व शुभेच्छा.

इमेज
  जाहिरात:- . 👇🏻 ************************************ अहिल्यानगर(हेमंत साठे):- तालुक्यातील कामरगाव येथील भारत सर्व सेवा संघ संचलित कामरगाव इंग्लिश स्कुल कामरगाव या विदयालयाचा दहावीचा निकाल 94.73% लागला. या निकालाच्या अनुषंगाने दहावी गुणवंतांच्या सत्कार समारोहाचे आयोजन कामरगाव ग्रामपंचायकडून दि  19 मे रोजी हनुमान मंदिर सभागृह कातोरेवाडी या ठिकाणी करण्यात आले होते. यावेळी गुणवंतापैकी प्रथम कु. धनश्री बाळासाहेब ठोकळ -92.60%,  हर्षदा अविनाश आंधळे- 86.80%,  तृतीय समृद्धी अंकुश ठोकळ-86.40%  चतुर्थ चि किशोर विजय ठोकळ-84.80%,  पाचवा सुयश घनश्याम कातोरे- 79.20% असे गुणानुक्रमे 5 विदयार्थ्याचा कामरगाव ग्रामपंचायत तसेच ग्रामस्थांकडून फेटा बांधून तसेच पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.       याप्रसंगी मा.सरपंच तथा ग्रामपंचायतचे विदयमान प्रशासक संदिप ढवळे, मा.सरपंच वसंतराव ठोकळ, विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन सुदाम ठोकळ, मा.सरपंच तुकाराम कातोरे, लक्ष्मण शामराव ठोकळ, शिवाभाऊ सोनवणे,पत्रकार हेमंत साठे, गणेश बनकर, कैलास झरेकर या मान्यवरांच्या हस्त...

हवालदार राजू सुद्रिक यांना 'पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह' प्रदान. *पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील व पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांच्या हस्ते गौरव..!

इमेज
​ अहिल्यानगर (हेमंत साठे):- पोलीस दलात प्रामाणिक सेवा आणि उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या जवानाचा गौरव होणे,हा संपूर्ण जिल्ह्यासाठी अभिमानाचा क्षण असतो.असाच एक सुवर्णक्षण अहिल्यानगर पोलीस दलाने अनुभवला आहे.आपल्या १५ वर्षांच्या अविरत आणि निष्कलंक सेवेचे फळ म्हणून पोलीस हवालदार श्री.राजू आप्पासाहेब सुद्रिक यांना महाराष्ट्र पोलीस दलातील अत्यंत प्रतिष्ठेचा 'पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह' (DG Insignia) पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे.​जिल्ह्याचे पालकमंत्री ना. डॉ.राधाकृष्ण विखे पाटील आणि नूतन पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांच्या हस्ते हा सन्मान सोहळा दिमाखात पार पडला. ​🎖️१५ वर्षांच्या निष्ठेचे फलित! ​महाराष्ट्र राज्य पोलीस  महासंचालक कार्यालयाकडून सन २०२५ या वर्षासाठीचे सन्मानचिन्ह नुकतेच घोषित करण्यात आले होते.राज्यभरातील ८०० निवडक अधिकारी आणि अंमलदारांच्या यादीत राजू सुद्रिक यांनी आपल्या कर्तृत्वाने स्थान मिळवले आहे.​ उत्कृष्ट सेवा अभिलेख:गेल्या १५ वर्षांपासून श्री.सुद्रिक यांनी अहिल्यानगर पोलीस दलात विविध जबाबदाऱ्या अत्यंत पारदर्शकपणे पार पाडल्या आहेत. ​कर्तव्याप्रती निष्ठा:राजू सुद्रि...

निष्ठा व शौर्याचा गौरव : अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे यांचा ‘स्नेहबंध’कडून सत्कार.

इमेज
  अहिल्यानगर(हेमंत साठे): –  महाराष्ट्र पोलीस दलातील उत्कृष्ट कामगिरीबद्दल दिल्या जाणाऱ्या मानाच्या पोलीस महासंचालक सन्मानचिन्हाने अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे यांचा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. या निमित्ताने स्नेहबंध सोशल फौंडेशनतर्फे संस्थापक अध्यक्ष डॉ. उद्धव शिंदे यांनी कलुबर्मे यांचा सन्मानपत्र व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करत शुभेच्छा दिल्या. सन २०२५ या वर्षासाठी मिळालेल्या या प्रतिष्ठित सन्मानामुळे अहिल्यानगर जिल्हा पोलीस दलाची मान उंचावली असून, जिल्ह्याच्या कार्यक्षमतेची राज्य स्तरावर दखल घेतली गेली आहे. अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे यांनी आपल्या कार्यकाळात निष्ठा, प्रामाणिकपणा व कर्तव्यदक्षतेने सेवा बजावत उल्लेखनीय कामगिरी केली आहे. त्यांच्या या यशाबद्दल नूतन पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी अभिनंदन केले. "अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे यांनी निष्ठा, धैर्य आणि उत्कृष्ट सेवेमुळे हा सन्मान मिळवला आहे. त्यांच्या कार्याचा राज्य स्तरावर झालेला गौरव हा संपूर्ण अहिल्यानगर जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब आहे.” – 'स्नेहबंध' फौंडेशन संस्था...

फॉलोअर