पोस्ट्स

सप्टेंबर, २०२३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

शेतकऱ्यांच्या मोटर केबल चोरणारे चोरटे जेरबंद ! स.पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप यांच्या पथकाने बीड जिल्ह्यातून केले आरोपी जेरबंद !

इमेज
नगर ( प्रतिनिधी) :- तालुक्यातील निमगाव घाणा, शिंगवे गावातुन शेतक-यांचे शेतातील पाण्याच्या मोटारीचे केबल चोरणारे दोन चोरटे जेरंबद करत २४.८०० रुपयाचे पाण्यातील मोटारीचे केबल जप्त करण्याची कारवाई बीड जिल्ह्यात जाऊन एमआयडीसी पोलीसांनी केली आहे.         याबाबत सविस्तर माहिती अशी की, दिनांक १९/०९/२०२३ रोजी फिर्यादी नामे बाळासाहेब सखाराम तळुले वय ४५ वर्ष धंदा- शेती रा निमगाव घाणा ता. जि. अहमदनगर यांनी एमआयडीसी पोलीस स्टेशनला फिर्याद दिली की, दि. १८/०९/२०२३ रोजी रात्री १०.३० वा चे सुमारास ते दि. १९/०९/२०२३ रोजी सकाळी ०८.३० वा चे दरम्यान निमगाव घाणा येथील एरोगेशनच्या तलावात टाकलेल्या इलेक्ट्रीक पाण्याच्या मोटरीच्या २४,८००/- रु किंमतीच्या श्री फेस केवल कोणीतरी अज्ञात चोरटयाने चोरुन नेली आहे. वैगेरे मचकुराचे फिर्यादीवरुन एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.         सदर गुन्हयाचा समांतर तपास करत असतांना सपोनि राजेंद्र सानप यांना गोपनिय माहिती मिळाली की. सदरचा गुन्हा हा १ ) अंबादास महादेव घुले, २) रामेश्वर भास्कर घुले, दोन्ही रा. कारखेल ता. आष्टी जि.बीड यांनी केला असून ते कारखेल येथ

पळवून नेलेल्या अल्पवयीन मुलीचा एम.आय.डी.सी. पोलीसांनी लावला २४ तासात शोध !

इमेज
नगर( प्रतिनिधी):- एमआयडीसी परीसरातून पळवून नेलेल्या अल्पवयीन मुलीचा २४ तासाचे आत एम आय डी सी पोलीसांनी शोध घेवून मुलीला पालकांचे स्वाधीन केले. याबाबत सविस्तर माहिती अशी की, दिनांक २७/०९/२०२३ रोजी चेतना कॉलनी नवनागापुर ता. जि. अहमदनगर येथील फिर्यादी यांनी फिर्याद दिली की, दिनांक २७/०९/२०२३ रोजी सकाळी ११/०० वा चे सुमारास चेतना कॉलनी नबनागापुर येथुन त्यांची अल्पवयीन मुलीला कोणीतरी अज्ञात इसमाने फुस लावून पळवून नेले वैगेरे मचकुराचे फिर्यादीवरून एमआयडीसी पोस्टे गुन्हा रजि नंबर ८९४ / २०२३ भादवि ३६३ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्हयाचा समांतर तपास करत असतांना सपोनि राजेंद्र सानप यांना गोपनिय माहिती मिळाली की, सदरची अल्पवयीन मुलगी हि शेंडी बायपास रोड एमआयडीसी अहमदनगर येथे आहे. त्यानुसार सपोनि राजेंद्र सानप यांनी एमआयडीसी पोलीस स्टेशनचे एक पथक तयार करुन गोपनिय माहितीच्या आधारे सदर अल्पवयीन मुलीचा शोध घेवून सदर मुलीस तिचे आईवडील यांचे ताब्यात देण्यात आले आहे. पुढील कारवाई एमआयडीसी पोलीस स्टेशनचे पोसई टिक्कल हे करीत आहेत. सदरची कारवाई मा. श्री राकेश ओला पोलीस अधीक्षक अहमदनगर, श्री.

कामरगाव येथे गणेश उत्सवानिमित्त रक्तदान शिबीराचे आयोजन.

इमेज
नगर ( हेमंत साठे):- गणेश उत्सव म्हटल की आनंद, उत्साह...संगीत,नृत्य,  तसेच सांस्कृतिक, धार्मिक विविध कार्यक्रमांचे गणेश मंडळाकडून आयोजन केले जाते. परंतु या व्यतिरिक्त सामाजिक जबाबदारीची जाणीव ठेवून नगर तालुक्यातील कामरगाव येथील जय बजरंग युवा प्रतिष्ठान मधील तरुणांनी गणेश उत्सवादरम्यान रक्तदान शिबीराचे आयोजन करत तरुणांपुढे एक आदर्श ठेवला.         दिनांक २७ सप्टेबर रोजी सकाळी १० ते ५ या वेळेत जनकल्याण रक्तपेढी नगर यांच्या माध्यमातून रक्तदान शिबीराचे आयोजन प्राथमिक आरोग्य उपकेंद्र कामरगाव येथे  केले होते. गणेश उत्सवानिमित्त आयोजित केलेल्या या रक्तदान शिबीरामधे ग्रामस्थ व तरूणांनी मोठया प्रमाणात रक्तदान करत आपली सामाजिक जबाबदारी पार पाडली.          आरोग्यवर्धिनी उपकेंद्र कामरंगाव प्राथमिक आरोग्यकेंद्र चास वैद्यकीय अधिकारी डॉ. निवेदिता माने, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. विनोद काकडे, जिल्हा आरोग्य अधिकारी, डॉ. बापूसाहेब नागरगोजे , आरोग्यसेवक संतोष सुरवसे,  परिचरिका अकोलकर व सर्व आशा सेविका यांच्या सहभागातून उपकेंद्र कामरगाव येथे जनकल्याण रक्तपेढी अहमदनगर यांच्या सहयोगाने भव्य रक्तदान शिबिर घेण्य

हॉटेल मधील कामगारांना दहशत करुन गंभीर जखमी करणारे पाच आरोपी भिंगार कॅम्प पोलीसांनी केले गजाआड !

इमेज
   नगर(प्रतिनिधी):- तालुक्यातील भिंगार पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या एका हॉटेल मधील कामगारांना दहशत करुन गंभीर दुखापत करणारे पाच आरोपी भिगांर कॅम्प पोलीसांनी कारवाई करत गजाआड केले आहेत.        याबाबत अधिक माहिती अशी की, दि. 13/09/2023 रोजी दुपारी 01/45 वाजे च्या सुमारास हॉटेल प्रकाश येथे जेवण करण्यासाठी आलेला सचिन शिंदे व सोबत 7 अनोळखी इसम यांच्यात जेवण करीत असताना आपसात मोठमोठ्याने आरडाओरड करुन भांडणे चालू होती. त्यावेळी हॉटेल मधील कामगार हे सचिन शिंदे व अनोळखी सात इसमांना भांडण करु नका असे सांगत असताना यातील आरोपी सचिन शिंदे यांने हॉटेल मधील वेटर याच्या डोक्यात सोडा वॉटरची बाटली मारुन गंभीर दुखापत केली व इतर अनोळखी सात इसमानी हॉटेल मधील इतर कामगारांना मारहाण करुन शिवीगाळ दमदाटी केली त्यावरुन हॉटेल प्रकाश चे मॅनेजर सुनिल संभाजी गुंजाळ यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन भिंगार कॅम्प पो स्टे येथे गुर नं 596/2023 भा दवि कलम 326, 324, 323, 504, 506, 143, 147, 149 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.         सदर गुन्ह्याचा तपास करताना सपोनी दिनकर मुंडे यांना गोपनिय माहिती मिळाली की, सदर चा गुन्हा

चोरीच्या मोटारसायकलींची माहिती मिळताच नगर मधील दुकानावर एम.आय.डी.सी.पोलीसांची धाड !

इमेज
  नगर(प्रतिनिधी):- नगर एम.आय.डी.सी पोलीस स्टेशन हददीत शेंडी शिवार येथे चोरीच्या मोटारसायकली जवळ बाळगणा-यास जेरबंद करण्यात आले असून त्यांच्या कडून २.१३,०००/-रुपयाच्या ५ मोटारसायकली व १६ मोटारसायकलीचे सुटटे केलेले पार्ट, इर्जिन व चेसी असा मुददेमाल जप्त करत एम.आय.डी.सी पोलीसांनी कारवाई केली आहे       याबाबत सविस्तर माहिती अशी की, दिनांक 19/09/2023 रोजी सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, नगर औरंगाबाद रोडला कृष्णा अँटो कन्सटल्ट येथे काहि मोटारसायकली व व मोटारसायकलचे खोललेले इंजिन चेसी व इतर साहित्य पडलेले असुन ते चोरीचे असण्याची शक्यता आहे. अशी बातमी मिळाल्याने सपोनि राजेंद्र सानप यांनी एमआयडीसी पोलीस स्टेशनचे पथक तयार करून त्यांना पंचासमक्ष सदर ठिकाणी खात्री करण्यासाठी पाठविले. एमआयडीसी पोलीस स्टेशनचे पथक कृष्ण अॅटो कन्सल्ट येथे जावून खात्री केली असता सदर ठिकाणी पाच मोटारसायकली व 17 मोटारसायकलचे सुटे केलेले पार्ट मिळुन आले. सदर बाबत दुकान मालक पांडुरंग गोविंद शिंदे यांचेकडे त्यांचे कागदपत्राची मागणी केली असता त्यांचेकडे कसलेही बिले तसेच मोटारस

रायतळे गावात आढळली मराठा सरदार राजेश्री संभाजी पवारांची ऐतिहासिक छत्री !

इमेज
  नगर( हेमंत साठे):- काही दिवसांपूर्वी  इतिहास अभ्यासक श्री सतीश सोनवणे यांनी पारनेर तालुक्यातील रायतळे गावाला भेट दिली तेव्हा त्यांना अनपेक्षितपणे एक सुंदर वास्तू नजरेस पडली. स्थानिक लोकांच्या मते हे महादेवाचे मंदीर आहे. जवळ जाऊन पाहिले तर हे मंदीर नसून मराठा सरदाराची छत्री असावी असे त्यांना वाटले. छत्री वर आठ ओळींचा देवनागरी  शिलालेख आढळला. त्याचे वाचन करण्याचा प्रयत्न केला. परंतु तो बऱ्यापैकी खराब झालेला असल्याने छाप घेऊनही काही शब्दच ओळखता आले. शिलालेख सुरुवात अशी -  १.राजेश्री सं भाजी पवार,  स्वराज्य उभारणीत ज्यांनी मोलाचं योगदान दिलं अशा पवार घराण्यातील योद्ध्याची राजेश्री संभाजी पवारांची ही छत्री. तेथेच समोर एक शिळा आहे ज्यावर शिव लिंग आणि अश्वारूढ मराठा सैनिक कोरलेला आहे पराक्रमी पवार घराणे - पवार घराण्याचे मूळ पुरुष साबुसिंग (शंभु सिंग ) पवारांना मानले जाते. निजाम शाहीत मलिक अंबरच्य काळात हे उदयास आले.  सुरवातीला ते कामरगाव जवळच्या डोंगरात राहत असत. नंतर त्यांनी सुखेवाडी नावाचे गाव वसवले तेच आजचे सुपे. हंगे गावच्या दळवी पाटलाशी यांचा पाटीलकी वरून वाद होता.शहाजी राजांच्या काळात

भोरवाडीतील शेतकऱ्याकडून फोन पे वर घेतली लाच ,वसुली अधिकारी अडकला अॅन्टी करप्शनच्या जाळ्यात !

इमेज
 नगर ( प्रतिनिधी):- तालुक्यातील भोरवाडी गावातील शेतकऱ्याला शेतजमीनीवरील कर्जफेड करण्यास मुदत दिली, जमिनीवरील जप्ती व लिलाव होऊ दिला नाही, या मोबदल्यात तक्रारदार शेतकऱ्याकडून कडून ७ हजाराची लाच स्वीकारताना नगर तालुका पतसंस्था फेडरेशनचे विशेष वसुली व विक्रीकर अधिकारी यासीन नासर अरब (वय ४२) यास रंगेहाथ पकडण्यात आले असून या प्रकरणात .विशेष म्हणजे ही लाच अधिकाऱ्याने रोख स्वरुपात न स्वीकारता फोन पे द्वारे स्वीकारली. आरोपीविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अहमदनगर कार्यालयाने कारवाई केली. कोतवाली पोलिस ठाण्यात आरोपीविरुद्ध १५ सप्टेंबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.           याबाबत अॅन्टी करप्शनच्या अधिकृत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, भोरवाडी (ता. नगर) येथील तक्रारदाराने २०१६ मध्ये केडगाव येथील भैरवनाथ ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेतून ५ लाख रुपयांचे कर्ज घेतले होतेत्या.वेळी तक्रारदाराने आई व मामाच्या नावे असलेल्या शेतीचे उतारे तारण म्हणून दिले होते. तक्रारदाराला कर्ज फेडण्यासाठी ५ वर्षांची मुदत देण्यात आली होती. मात्र तक्रारदार वेळे कर्ज फेडू शकले नाहीत. या प्रकरणी भैरवनाथ पतसंस्थ

शेतकऱ्याला लिफ्ट मागून छेडछाडीची धमकी देत , ब्लॅकमेलींग करून खंडणी उकळणारी महिला जेरबंद ! सपोनि शिशिरकुमार देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली नगर तालुका पोलीसांची कारवाई !

इमेज
नगर( प्रतिनिधी):- पाथर्डी तालुक्यातील शेतकऱ्याला  महिलेने लिफ्ट मागीतली व कौडगाव येथे खंडणी मागून ब्लॅकमेलिंग करणाऱ्या महिलेला सहाय्यक पोलीस निरीक्षक शिशिकुमार देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली नगर तालुका पोलिसांनी केले जेरबंद !       याबाबत सविस्तर माहिती अशी की , कौडगाव ते जाम फाटा अनोळखी महिलेने पाथर्डी तालुक्यातील शेतकऱ्याला लिफ्ट मागितली संबंधित शेतकऱ्यांनी त्या महिलेला कौडगाव येथून जाम फाट्यापर्यंत लिफ्ट दिली.    लिफ्ट दिलेल्या महिलेने छेड काढल्याची तक्रार देण्याची धमकी देत पैशाची मागणी केली. दरम्यान, संबंधीत शेतकऱ्याने  नगर तालुका पोलिसांना माहिती देत फिर्याद दिली. फिर्याद दाखल होताच नगर तालुका पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक शिशिरकुमार देशमुख यांनी तत्काळ पथक सोबत घेऊन पोलीस उपनिरीक्षक युवराज चव्हाण ,महिला पोलीस नाईक गायत्री धनवडे ,पोलीस कॉन्स्टेबल राजू खेडकर,पोलीस कॉन्स्टेबल सुभाष थोरात,पोलीस कॉन्स्टेबल शिवाजी खरात, कॉन्स्टेबल कमलेश पाथरूड पथक सोबत घेऊन  तत्काळ संबंधित महिलेचा ठाव ठिकाणा शोधून कौडगाव शिवारातून  सविता बाळासाहेब मगर (रा. तपोवन रस्ता, सावेडी, नगर महिले

खासदार.डॉ.सुजय विखे पाटील व मा.आमदार शिवाजी कर्डिलेंच्या संकल्पनेतून कामरगाव व परिसरातील महिला भाविकांना मोफत देवदर्शन !

इमेज
  नगर ( प्रतिनिधी):- तालुक्यातील कामरगाव व परिसरातील 500 महिला भाविकांना खा.डॉ.सुजय विखे पाटील व मा. आमदार शिवाजी कर्डिले यांच्या संकल्पनेतून श्री.क्षेत्र शिर्डी व श्री. क्षेत्र शनी शिंगणापूर मोफत दर्शन घडविण्यात आले.        याबाबात सविस्तर माहिती अशी की, नगर दक्षिण चे खासदार डॉ. सुजय विखे पाटील व मा. आमदार शिवाजी कर्डिले यांनी नगर तालुक्यातील प्रत्येक गावातील  महिला भाविकांना शिर्डी व शिंगणापूर देवदर्शन घडविण्यात येत आहे. 13 सप्टे 23 बुधवारी कामरगाव परिसरातील महिलांना देवदर्शन यात्रा आयोजित करण्यात आली होती. यावेळी मा. आमदार शिवाजी कर्डिलेंनी उपस्थित राहून सुखकर प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या.          खासदार डॉ. सुजय विखे पाटील व. मा.आमदार शिवाजी कर्डिलेंच्या संकल्पनेतून उत्कृष्ट नियोजन करण्यात आले होते. सुव्यवस्थित बससेवा, महिला भाविकांना ठिकठिकाणी चहा, नाष्टा , जेवणाची सोय करण्यात आली होती. प्रत्येक महिला भाविकाला सुरक्षितता व सुव्यवस्थित देवदर्शन होण्यासाठी पास देण्यात आले होते. यावेळी  कामरगाव व परिसरातील  महिला भाविकांनी देवदर्शनासाठी करण्यात आलेल्या उत्कृष्ट नियोजनाचे कौतुक केले.

पारनेर भाजप तालुका अध्यक्ष पदी राहुल शिंदे पाटील यांची निवड !

इमेज
पारनेर(प्रतिनिधी) तालुक्यातील खासदार डॉ. सुजय विखे यांचे कट्टर समर्थक तसेच पारनेर भारतीय जनता पार्टीतील लोकप्रिय स्थानिक नेते राहुल प्रकाशराव शिंदे यांची भाजप पारनेर तालुकाध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे.        याबाबत सविस्तर माहिती अशी की, नगर दक्षिणचे खासदार डॉ.सुजय विखे पाटील यांचे कट्टर समर्थक तथा पारनेर भाजपचे नेते राहुल शिंदे पाटील यांची नगर भाजप जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग यांनी पारनेर पारनेर तालुकाध्यक्ष पदी नियुक्ती केली आहे. राहुल पाटील शिंदे यांचे पारनेर तालुक्यातील काम तसेच दांडगा जनसंपर्क पाहता पक्षाने त्यांची तालुकाध्यक्ष पदी निवड केल्याचे समजते.   📲 *बातमी व जाहिरातीसाठी संपर्क:- 7057791882*

कराटे स्पर्धेमधे कामरगाव मधील विदयार्थ्यांचे घवघवीत यश !

इमेज
  नगर (हेमंत साठे):- अहमदनगर शो तोकोन डो असोशिएशनच्या खेळाडूंनी सावेडी येथे झालेल्या सब ज्युनिअर कॅडेट ज्युनिअर व सिनिअर मुलामुलींच्या  स्पर्धेमधे  उत्कृष्ट प्रदर्शन करून पदकाची कमाई केली.          कामरगाव येथील कराटे खेळाडूनी 3 सुवर्ण, ३ रौप्य, व ७ कांस्य पदकाची कमाई केली. या स्पर्धत जिल्ह्यातील खेळाडूंनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला होता.       या कराटे स्पर्धामधे कामरगाव जिल्हा परिषद शाळेच्या ३ खेळाडूनी सहभाग घेतला त्यापैकी वैष्णवी ठोकळ हीने सुवर्ण, सार्थक साठे याला सुवर्ण व कास्य तर आदेश चौधरी रौप्य व कास्य पदक पटकाविले.          कामरगाव इंग्लिश स्कुल मधील ६ खेळाडूंनी सहभाग नोंदविला होता. यापैकी धनश्री कापरे हीला सुवर्ण व रौप्य  तर आज्ञा चौधरी रौप्य व कास्य, साईराज चौरे कास्य पदक,  सुजल जाधव कास्य पदक, प्राजंल पाडेकर कास्य, सार्थ सोनवणे कास्य पदक , अशा प्रमाणे खेळाडूंनी पदके मिळवत घवघवीत यश मिळवले. क्रीडा प्रशिक्षक सुरेश जाधव म्हणाले की, शिक्षणासोबत खेळाला देखील महत्व आले आहे. अनेक मुला मुलींनी खेळातून आपले करिअर घडवले आहे. सध्याच्या युगात समाजात अपप्रवृत्तींना प्रत्युत्तर देण्यास

महिला कुस्तीपटूंच्या थरारक कुस्त्यांनी नगर तालुका शालेय कुस्ती स्पर्धेचा समारोप ! ; विजयी कुस्तीपटूंची जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड !

इमेज
नगर (हेमंत साठे)- ह्रद्याचा ठोका चुकवित विविध डावपेचांनी महिला कुस्तीपटूंनी नगर तालुका शालेय कुस्ती स्पर्धा गाजवली. मंगळवारी (दि.12 सप्टेंबर) मुलींच्या चित्त थरारक कुस्त्यांनी स्पर्धेचा समारोप झाला. या स्पर्धेत सर्वोत्कृष्ट खेळ करणारे मुलांमध्ये श्री बाणेश्‍वर विद्यालय (बुऱ्हाणनगर) व मुलींमध्ये श्री नृसिंह विद्यालय (चास) च्या संघांना जनरल चॅम्पियनशिप चषक प्रदान करण्यात आले.     जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व नगर तालुका क्रीडा समितीच्या माध्यमातून नगर तालुका तालिम सेवा संघाच्या वतीने नेप्ती, नगर-कल्याण महामार्गावरील अमरज्योत लॉनमध्ये दोन दिवसीय कुस्ती स्पर्धा उत्साहात पार पडली. या स्पर्धेला नगर तालुक्यातील महिला कुस्तीपटूंचा उत्स्फूर्त सहभाग लाभला. शेवटच्या अंतिम कुस्त्या नगर तालुका सामाजिक वनीकरण विभागाचे वन क्षेत्रपाल हेमंत उबाळे यांच्या हस्ते लावण्यात आल्या. यावेळी नगर तालुका तालिम सेवा संघाचे अध्यक्ष पै.नाना डोंगरे, सचिव पै. बाळू भापकर, युवा महाराष्ट्र केसरी विष्णू खोसे, प्राचार्य सुभाष नरवडे, पंच पै. गणेश जाधव, मल्हारी कांडेकर, रमाकांत दरेकर, मिलिंद थोरे, चंद्रकांत पवार, जयश्री भ

धक्कादायक... नगर तालुक्यात जावयाने केला सासूचा खून ! नगर तालुका पोलीसांनी लावला खूनाचा छडा !

इमेज
  नगर( प्रतिनिधी):- न्यायालयात पोटगीची केस दाखल केल्याच्या रागातून जावयाने सासूचा खून करून मृतदेह पोत्यात घालून सितेवाडी फाटा ते जुन्नर रस्त्यावरील गणेशखिंड (ता. जुन्नर, पुणे) येथील दरीत फेकून दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. लताबाई अरुण कडव (वय ७०, रा. शिवाजीनगर, कल्याण रस्ता) असे मयत महिलेचे नाव आहे. याप्रकरणी जुन्नर पोलीस ठाण्यात जावई बाळू तुकाराम विधाते (रा. शिवाजीनगर, कल्याण रस्ता) याच्याविरूध्द खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला नगर तालुका पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक शिशिर कुमार देशमुख यांच्या पथकाने अटक करत तपासकामी नगर तालुका पोलिसांकडे वर्ग केले आहे. याप्रकरणी मयत कडव यांचे दुसरे जावई अण्णा ढेरे (वय ५१, रा. बोल्हेगाव फाटा, नगर) यांनी फिर्याद दिली आहे. लताबाई व त्यांचा जावई बाळू हा पत्नी मुलाबाळांसह शिवाजीनगर, कल्याण रस्ता परिसरात राहतात. बाळू व त्याची पत्नी मिना यांचे लताबाई यांच्याशी मागील काही दिवसांपासून वारंवार वाद होत होते. याप्रकरणी लताबाई यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात तक्रार देखील दिली आहे. दरम्यान, ३० ऑगस्ट रोजी लताबाई या त्यांच

स.पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप यांचा विशेष पोलीस महानिरीक्षक बी.जी. शेखर यांच्याकडून गौरव ! एम.आय.डी.सी. पोलीसांची प्रशंसनीय कामगिरी ! ८ महिन्यात १७४ गुन्ह्यातील १०० आरोपी केले गजाआड !

इमेज
  नगर( हेमंत साठे) :-  नगर एम.आय.डी.सी पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप यांच्या मार्गदर्शनाखाली एम.आय.डी.सी पोलिसांनी 8 महिन्यात पकडले 174 गुन्हयातील 100 आरोपी जेरबंद केले असून या प्रशंसनीय कामगिरी केल्याबद्दल एम.आय.डी.सी पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी राजेंद्र सानप यांचा नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महारीक्षकांनी डॉ..बी.जी शेखर पाटील व जिल्हा पोलीस प्रमुख राकेश ओला यांनी गौरव केला आहे        याबाबत अधिक माहिती अशी की यावर्षी १ जानेवारी पासून ऑगस्ट अखेर पोलिस ठाण्यात दाखल झालेल्या १७४ गुन्ह्यातील १०० आरोपींना जेरबंद करून एकूण १ कोटी ५२ लाख रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्याची कामगिरी एम.आय.डी.सी पोलिसांनी केली आहे. या कामगिरीची दखल घेत नाशिक परिक्षेत्रचे विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ. बी. जी. शेखर पाटील यांनी पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी असलेले सहाय्यक पोलिस निरीक्षक राजेंद्र सानप यांचा सत्कार केला आहे.          विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ. बी. जी. शेखर पाटील यांनी आगामी सन उत्सवांच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी नगरमध्ये येवून जिल्ह्याचा गुन्हेगारी व

नगर एम.आय.डी.सी परिसरातून दुचाकी चोरणारा गजाआड ! स. पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप यांच्या पथकाची धाडसी कारवाई !

इमेज
नगर ( प्रतिनिधी):- नगर एम.आय.डी.सी परीसरातून मोटारसायकलची चोरी करणा-या सराईत गुन्हेगारास एम.आय.डी.सी पोलीसांनी अटक करत त्याच्या कडून ३,१०,००० /- रु किमतीच्या ४ मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत.         याबाबत सविस्तर माहिती अशी की, दिनांक 28/08/2023 रोजी फिर्यादी नामे बाबासाहेब बापुराव तेलोरे वय-43 वर्ष रा. व्यंकटेश अर्पाटमेंट नवनागापूर ता जि अहमदनगर यांनी फिर्याद दिली की, दिनांक 08/08/2023 रोजी सकाळी 11/00 वा चे सुमारास स्टेट बैंक ऑफ इंडीया नागापुर येथून त्यांचे मालकीची 100000 /- रु कि ची शाईन मोटारसायकल नंबर एम एच 16 यो एक्स 7846 हि कोणीतरी अज्ञात चोरटयाने चोरून नेली आहे. वैगेरे मजकुराचे फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस स्टेशनला गु रजि नंबर 804/2023 भादवि कलम 379 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदर गुन्हयाचा समांतर तपास करत असतांना सपोनि राजेंद्र सानप यांना गोपनिय माहिती मिळाली की, सदरचा गुन्हा हा सराईत आरोपी नामे १) किशोर जयसिंग पटारे रा. पिंपळगाव माळवी ता. जि. अहमदनगर याने केला आहे. त्यानुसार सपोनि राजेंद्र सानप यांनी एमआयडीसी पोलीस स्टेशनचे एक पथक तयार करून गोपनिय माहितीच्या आधा

सुपा ग्रामपंचायत CCTV यंत्रणा बसवणारी तालुक्यातील पहिली ग्रामपंचायत ! सुपा गावावर आता नजर ठेवणार तिसरा डोळा !; वाढत्या गुन्हेगारीला व चोरीला चाप बसविण्यासाठी सुपा सरपंच व पदाधिकाऱ्यांचा कौतुकास्पद निर्णय !

इमेज
पारनेर (हेमंत साठे)-:- सुपा औदयोगिक वसाहत व जापनीज पार्क मुळे राज्यात नावारूपाला आलेले गाव म्हणजे पारनेर तालुक्यातील सुपा गाव. MIDC परिसर व गावातील वाढत असलेल्या वसाहती मुळे सुपा ग्रामपंचायतच्या सरपंच व सदस्यांनी गावाच्या सुरक्षिततेची काळजी घेत एक अभिनव निर्णय घेतला तो म्हणजे संपूर्ण सुपा गावात CCTV यंत्रणा बसविण्याचा. हा स्तुत्य उपक्रम हाती घेत थोड्या कालावधीत संपूर्ण गावात CCTV यंत्रणा बसविण्यात आली आहे.  याबाबत अधिक माहिती अशी की, पारनेर तालुक्यातील  सुपा ग्रामपंचायत तालुक्यातील पहीली सी.सी.टीव्ही लावणारी  ग्रामपंचायत ठरली असून आता गावातील नागरीकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने सुपा गावावर CCTV रूपाने तिसऱ्या डोळयाची नजर राहणार आहे. या निर्णयामुळे वाढत्या गुन्हेगारीला व चोरीला चाप बसणार असून गावातील नागरीकांची सुरक्षितता राहणार आहे.          या CCTV यंत्रणा उद्घाटन प्रसंगी औद्योगिक सुपा गावच्या सरपंच सौ. मनिषा योगेश रोकडे, सुपा पोलीस स्टेशन च्या पोलीस निरीक्षक ज्योती गडकरी, मा. उपसरपंच दत्तानाना पवार, उद्योजक योगेश रोकडे, सेवा सोसायटी चे चेअरमन दिलीप पवार, ग्रा पं. सदस्य पप्पुशेठ पवार

लक्ष्मणराव ठोकळ मित्रपरिवाराच्या पाठपुराव्याला यश .; सदगुरु साधुबाबा सभामंडपासाठी भरीव निधीची मा.मंत्री शिवाजीराव कर्डिलेंची घोषणा !

इमेज
  नगर (प्रतिनिधी):- तालुक्यातील कामरगाव येथील सदगुरू साधुबाबा मंदिराच्या सभामंडपासाठी कामरगावचे विदयमान ग्रामपंचायत सदस्य लक्ष्मणराव ठोकळ व मित्रपरिवाराकडून मागील अनेक दिवसापासून मा मंत्री तथा जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजीराव कर्डिले व नगर दक्षिण चे खासदार डॉ.सुजय विखे पाटील यांच्याकडे पाठपुरावा केला होता. या पाठपुराव्यास यश प्राप्त झाले असून मा.मंत्री कर्डिले यांनी सभामंडपासाठी दहा लाख रूपयाचा निधी देण्याची घोषणा केली आहे. असे संस्थेचे विश्वस्त राम नानेकर यांनी सांगितले.      याबाबत सविस्तर माहिती अशी की,  कामरगाव येथील सद्गुरु साधु बाबा मठाच्या सभामंडपासाठी विदयमान ग्रामपंचायत सदस्य लक्ष्मणराव ठोकळ व मित्रपरिवाराने मा.मंत्री. तथा जिल्हा सहकारी बॅंकेचे अध्यक्ष व खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला होता.         दि ५ सप्टेबर रोजी कामक्षा माता सप्ताह निमित्ताने मा.मंत्री.कर्डिले हे काम रगाव येथे आले होते. काल्याच्या किर्तनानंतर सदगुरु साधु बाबा मंदिर येथे कर्डिलेंनी भेट दिली. यावेळी लक्ष्मणराव ठोकळ मित्रपरिवाराच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत. मा.मंत्री शिवा

कामरगावचे युवा नेते गणेश साठे यांचा वाढदिवसानिमित्त अनोखा सामाजिक उपक्रम.; वाढदिवसाच्या अनाठायी खर्चाला फाटा देत नवा सामाजिक आदर्श !

इमेज
 नगर (प्रतिनिधी) :- आजकाल वाढदिवस म्हटल की चमकोगिरी,  डिजेचा दणदणाट,अनाठायी खर्च, करण्याची वृत्ती एकीकडे  वाढत असतांना दुसरीकडे सामाजिक भावनेतून वाढदिवसानिमित्त आपल्या आनंदात सहभागी करून चिमुकल्यांसोबत वाढदिवस साजरा करण्याच उदाहरण  समाजात तसं क्वचितच पाहायला मिळत. असाच एक नवा सामाजिक उपक्रम कामरगावचे युवा नेते तथा विद्यमान ग्रामपंचायत सदस्य गणेश रावसाहेब साठे यांनी राबविला.        याबाबत अधिक माहिती अशी की, कामरगावचे युवा नेते गणेश साठे  यांनी आपला वाढदिवस साजरा करताना सामाजिक बांधिलकी जपत, गावातील व पंचक्रोशितील आपल्या युवा सहकऱ्यांसोबत  ज्या प्राथमिक शाळेत शिकलो त्या शाळेप्रती आपली सामाजिक जाणीव ठेवून त्यांनी आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने शाळेच्या रंग रंगोटीसाठी व विकास कामांसाठी जी निधीची अडचण येत होती. याची माहिती मिळाल्यानंतर त्यासाठी सर्व सत्कार, शुभेच्छा व अनाठायी खर्च टाळून ११०००/- रुपये रोख मदत केली. त्यांच्या या मदतीमुळे शाळा विकासासाठी मदत झाली असून वाढदिवसाच्या अनाठायी खर्चाला फाटा देत एक नवा सामाजिक उपक्रम राबवत आदर्श निर्माण केला आहे.          या प्रसंगी युवा नेते गणेश स

कामरगाव येथील कामक्षा माता सप्ताह सोहळा उत्साहात संपन्न !

इमेज
नगर( हेमंत साठे):- तालुक्यातील नगर पुणे महामार्गालगत असलेल्या श्री क्षेत्र कामरगाव येथे कामक्षा माता सप्ताहाचे आयोजन मोठया उत्साहात करण्यात आले होते. या सप्ताहाची सांगता दि ५ सप्टेबर रोजी काल्याच्या किर्तनाने करण्यात आली.        याबाबत सविस्तर माहिती अशी की, सालाबादप्रमाणे यावर्षी देखील कामक्षा माता सप्ताहाचे आयोजन दि २९ ऑगष्ट ते ५ सप्टेबर या कालावधीत करण्यात आले होते. सप्ताह काळात मोठ्या धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन कामरगाव ग्रामस्थ व भाविकांकडून करण्यात आले होते. पहिल्या दिवसापासून ते काल्याच्या किर्तनापर्यंत नामांकित किर्तनकारांची किर्तन सेवा होती. दररोज पारायण पठण, हरिपाठ, भाविकांना नाष्टा, पंगत, काकड आरती, सायंकाळ आरती असे विविध कार्यक्रम सप्ताह कालावधी मधे होते. सातव्या दिवशी ४ सप्टेबर रोजी कामक्षा मातेचा पालखी सोहळा पार पडला. {कामक्षा माता पालखी सोहळयाचा व्हिडिओ पाहा..👆🏻}           यावेळी भगव्या पताका हाती घेतलेले भाविक, टाळ मृदुंगाच्या गजरात रममाण झालेले बालगोपाळ व तरुण तर कामक्षा मातेचा महिमा वर्णन करणारे भक्ती गीत गाणारा महिला वर्ग  यामुळे पालखी सोहळ्याचे संपूर्ण वातावरण भक्त

पत्रकार हेमंत साठे उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्काराने सन्मानित !

इमेज
नगर (प्रतिनिधी):- पत्रकारिता तसेच सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल तसेच निर्भिड व वस्तुनिष्ठ पत्रकारिते साठी पत्रकार व शैक्षणिक सल्लागार हेमंत साठे यांना उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार २०२३ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. याबाबत सविस्तर माहिती अशी की, नगर जिल्हयातील प्रतिष्ठेचा मानला जाणारा व स्व. पै. किसनराव  डोंगरे बहुद्देशिय संस्थेकडून आयोजित सामाजिक , शैक्षणिक, पत्रकारिता शेत्रात उल्लेखनिय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान तसेच गुणगौरव करण्यासाठी हा राज्यस्तरीय पुरस्कार सोहळा रविवार दि. ३ सप्टेंबर 23 रोजी नगर शहरातील अमर ज्योत लॉन्स येथे पार पडला. या पुरस्कार सोहळ्यात पत्रकारिता तसेच सामाजिक व शैक्षणिक, साहित्य क्षेत्रात उल्लेखनिय कार्य करणाऱ्या व्यक्तींना सन्मानित करण्यात आले.  या राज्यस्तरीय पुरस्कार सोहळयाचे प्रमुख अतिथी नगर पारनेर विधानसभा मतदार संघाचे आमदार.निलेश लंके हे होते. तर स्वागताध्यक्ष मा. जिल्हा परिषद सदस्य तथा उद्योजक माधवराव लामखडे हे होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी शद्बगंध साहित्य परिषदेचे राजेंद्र उदागे हे होते. तर या कार्यक्रमाच्या दुसऱ्य

फॉलोअर